घरCORONA UPDATEबारामतीकरांनो सावधान! रिक्षा चालकानंतर भाजी विक्रेत्याला कोरोना

बारामतीकरांनो सावधान! रिक्षा चालकानंतर भाजी विक्रेत्याला कोरोना

Subscribe

रिक्षा चालकानंतर आता भाजी विक्रेत्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर गेला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तर बारामतीकरांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण बारामतीत आता रिक्षा चालका पाठोपाठ भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा ५ किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण

बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. आता रिक्षाचालकानंतर बारामती शहरातील समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील ५ किमीपर्यंतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नागरिकांनी दक्षता घेण्याबरोबरच घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या आधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या भाजी विक्रेच्या संपर्कात कोण कोण आले, त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे बारामतीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; कोरोनाग्रस्तांची संख्या ८९१ वर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -