घरमहाराष्ट्रबोलता बोलता अजित पवार झाले 'उपमुख्यमंत्र्यां'चे 'विरोधी पक्षनेते'

बोलता बोलता अजित पवार झाले ‘उपमुख्यमंत्र्यां’चे ‘विरोधी पक्षनेते’

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तापरिवर्तन झाले. यात सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र अजित पवार यांना या सत्ता बदलाचा काही वेळासाठी विसर पडल्याचे दिसले. माध्यमांशी बोलताना अजित पवार सवयीप्रमाणे स्वत:चा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री असा करणार होते. मात्र हा शब्द पूर्ण करण्याआधीच आपण चुकीचे बोलतोय हे लक्षात येताच त्यांनी लगेच विरोधी पक्षनेते असा उल्लेख करत आपली बाजू सावरली. यामुळे अजित पवारांकडून बोलता बोलता स्वत:चा उल्लेख उपमुख्यमंत्री होता होता वाचला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे- फडणवीस यांच सरकार येऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. यात आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत होते. मात्र सरकार कोसळताच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडे आहेत.

- Advertisement -

अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील बारामती दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांना माध्यमांनी परमबीर सिंह वसुली प्रकरणी निलंबित डीसीपी पराग मनेरे यांच्या निलंबन रद्द करत पुन्हा सेवेत घेण्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मला याबाबत काही माहित नाही, मी कालपासून दौऱ्यावर आहे, मी तिथे गेल्यानंतर त्याची माहिती घेईन. आज मी राज्याचा उप… विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याशी बोलतो. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेत त्याआधारे वक्तव्य करेन. मी सोमवारी गेल्यानंतर याबाबत माहिती घेईन.

अजित पवार महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे माध्यमांशी बोलताना त्यांना नेहमी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याची सवय लागली होती, त्यामुळे ही सवय सुटण्यासाठी अजित पवार यांनी वेळ लागत असल्याचे दिसते. अशात महाविकास आघाडी सरकार सत्तेत नसतानाही अजित पवार यांचे काम थांबलेले नाही. उपमुख्यमंत्री असतानाही ते राज्यभर दौरे करत होते तर विरोधी पक्षनेता म्हणूनही ते राज्यभरातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा करत आहेत. मात्र बारामतीत असताना माध्यमांना प्रतिक्रिया देताना सवयीप्रमाणे स्वत:चा उल्लेख उपमुख्यमंत्री करणार होते मात्र ही बाब लक्षात येताच तातडीने विरोधी पक्षनेता असा उल्लेख केला. परंतु हा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही अजित पवार यांनी टीका केली आहे. एक महिना झाला तरी यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त मिळेना. का याला ग्रीन सिग्नल मिळत नाही, का एकवाक्यता होत नाही? ते नेमके कशाला घाबरतात हेच समजत नाही, अस अजित पवार म्हणाले.

राज्यातील 13 कोटी जनता त्यांच्याकडे आशेने बघतेय. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सचिवांशी बोललो तरी ते म्हणतात मंत्री महोद्यांच्या रिमार्कची गरज आहे. त्यांची रिमार्क असल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही, त्यामुळे आता कसा कारभार चाललाय ते जनता पाहतेय. असही अजित पवार म्हणाले.


शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा निधी रोखण्यावरून सतेज पाटलांची टीका, म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -