घरमहाराष्ट्रBarsu Refinery : विरोधकांच्या अज्ञानामुळे प्रकल्प थांबू नये म्हणून... नारायण राणेंचा निर्धार

Barsu Refinery : विरोधकांच्या अज्ञानामुळे प्रकल्प थांबू नये म्हणून… नारायण राणेंचा निर्धार

Subscribe

मुंबई : कोकणातील राजापूर तालुक्याच्या बारसू सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. स्थानिकांसह ठाकरे गटाने या प्रकल्पाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी, विरोधकांच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प थांबू नये, अशी भूमिका मांडली आहे.

रत्नागिरीतील बारसू-सोलगाव रिफायनरीच्या सर्वेक्षणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. त्यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बारसू सोलगावातील लोकांची शनिवारी (ता. 06 मे) भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते. पण याच दिवशी आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यावतीने बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्यामुळे आता हे दोन्ही विरोधक एकमेकांच्या समोर येणार आहेत.

- Advertisement -

या समर्थन मोर्चाची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे रिफायनरीच्या समर्थनात निघाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

- Advertisement -

हा तिढा निर्माण झालेला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मी कोकणात जाणार असल्याची घोषणा केली. बारसू येथे होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे येऊन त्यातून रोजगारनिर्मिती होईल. पायाभूत सुविधा, शैक्षणिक व आरोग्याच्या उत्तम व्यवस्था निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प होणे आवश्यक आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Barsu Refinery : बारसू गावात ठाकरे गट आणि महायुती येणार समोरासमोर

काही लोक म्हणत आहेत कोकणाचा कॅलिफोर्निया करू. कॅलिफोर्नियात असे 14 प्रकल्प आहेत. विरोधकांच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प थांबू नये म्हणून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मी देखील 6 मे रोजी कोकणात जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -