घरमहाराष्ट्रकशी नशिबानं थट्टा आज मांडली... हे गाणं ऐकताच अमृता फडणवीसांसमोर आला 'हा'...

कशी नशिबानं थट्टा आज मांडली… हे गाणं ऐकताच अमृता फडणवीसांसमोर आला ‘हा’ चेहरा

Subscribe

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी चर्चा राजकारणात नेहमी रंगते. यात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत, त्यामुळे राज्याचे राजकारण आता चर्चेचा केंद्रबिंदू राहिले आहे. मात्र या सत्तासंघर्षामागे एक नाव प्रखर्षाने समोर येत आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. राजकारणात आत अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांना गुरु मानतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस नेहमी राजकारणात चर्चेचा विषय असतात, आजही त्या एका राजकीय वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. याच कारण म्हणजे सुबोध भावे होस्ट झी मराठीवरील बस बाई बस हा कार्यक्रम. नुकतचं या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी यांनी हजेरी लावली, यावेळी सुबोध भावेंनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच बस बाई बस कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सुबोध भावे यांनी प्रश्न विचारण्याआधी त्यांना कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे पिंजरा चित्रपटातील गाणं ऐकवलं, या गाण्याच्या एक दोन ओळी ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, हे गाणं ऐकताच तुमच्या समोर कोणाचा चेहरा येतो. या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. यावर त्यांनी पुढे असही स्पष्टीकरण दिले की, मी उद्धव ठाकरे यांचा मानसन्मान ठेवते, मात्र हे गाणं ऐकल्यानंतर मात्र मला उद्धव ठाकरे यांचाच चेहरा समोर येतो. यावेळी उद्धव ठाकरेंचे नाव घेताच कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकचं हशा पिकला.

- Advertisement -


यावेळी अमृता फडणवीस यांना त्या मंगळसूत्र गळ्यात का नाही घालत यावरही एक प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी मंगळसूत्र गळ्यात घालण्यापेक्षा हातात का घातले यामागे एक वेगळीचं गोष्ट सांगितली. अमृता फडणवीस म्हणाल्या की, सौभाग्याचं निशाण म्हणून मंगळसूत्र आपण गळ्यात घालतो, पण तेच मंगळसूत्र मी गळ्यात न घालता हातात घालते, कारण आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा आपला हात धरवा हा विचार त्यामागे आहे. असा विचार जेव्हापासून मी करते आहे तेव्हापासून मी हातात मंगळसूत्र घालायला लागले. असही त्या म्हणाल्या.


दोनदा 10वीत नापास झालेल्या राऊतांचा कायद्याशी संबंध काय?, निलेश राणेंची खोचक टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -