Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे नाव जाहीर केल्यानंतर काही तासांतच उपमुख्यमंत्र्यांचे 'असे' ट्वीट

कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे नाव जाहीर केल्यानंतर काही तासांतच उपमुख्यमंत्र्यांचे ‘असे’ ट्वीट

Subscribe

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही मागणी मी 16 मार्च 2023 ला मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं म्हटलं. त्यामुळे कोस्टल रोडच्या नामकरणावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याची दिसून आली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होत आहे. त्यामुळे त्याचा हा आनंद मोठा आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही मागणी मी 16 मार्च 2023 ला मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं म्हटलं. त्यामुळे कोस्टल रोडच्या नामकरणावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याची दिसून आली. ( Battle of credit between Chief Minister eknath shinde Deputy Chief Minister devendra Fadnavis in the name of Coastal Road as a Chhatrapati Sambhaji maharaj  )

फडणवीसांचं ट्वीट काय? 

मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्यावतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटंल आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री काय म्हणाले?

संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे. तसचं यावेळी त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच, त्यांनी मविआवर निशाणाही साधला, मागच्या सरकारने अल्प मतात आल्यावर घाईघाईने हा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘सत्तांध लोकांनी अटलजींचे विचार अंगी बाणवावेत’, राज ठाकरेंनी टोचले भाजप नेत्यांचे कान )

- Advertisment -