घरताज्या घडामोडीरेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये करोना व्हायरसची दहशत; बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी

रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये करोना व्हायरसची दहशत; बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी

Subscribe

रेल्वे कर्मचारी संघटनाकडून चक्क रेल्वेला एक पत्र लिहून हजेरी घेणारी बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी केली आहेत. त्यामुळे या मागणीवर सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक असल्याची माहिती रेल्वे कर्मचारी संघटनाकडून देण्यात आली आहे.

संपूर्ण जगात करोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. देशात करोना व्हायरसचे २९ रुग्ण आढळून आले. परिणामी करोना व्हायरसचा धसका रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी रेल्वे कर्मचारी संघटनाकडून चक्क रेल्वेला एक पत्र लिहून हजेरी घेणारी बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी केली आहेत. त्यामुळे या मागणीवर सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक असल्याची माहिती रेल्वे कर्मचारी संघटनाकडून देण्यात आली आहे.

दररोज भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी मुंबईच्या उपनगरी लोकल सेवेतून २५ टक्के प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकावर उसळणारी गर्दी आणि खचाखच भरलेल्या लोकलमधून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवाशांचा सुरक्षेसाठी रेल्वे मंडळाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. यातच आता रेल मजदूर युनियनकडून कर्मचाऱ्यांचा आरोग्याची काळजी करिता कोरोना व्हायरस प्रादुर्भाव होऊ नयेत, म्हणून पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य लक्षात घेता काही दिवसांसाठी हजेरी लावण्यात येणारी बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी केली आहे. दररोज रेल्वे कर्मचारी बायोमेट्रिक मशीनमध्ये बोटाने पंच करून आपली हजेरी लावत असतात, मात्र या मशीनमुळे सुद्धा करोना व्हायरस पसरू शकतो. त्यामुळे तात्काळ या मशीनवर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी रेल्वे मजदूर यूनियनकडून करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांनी सकारात्मकता दाखवली आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून अद्यापी या मशीन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे. लवकरच या संबंधित निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

दिल्ली बॉयमेट्रिक मशीन बंद

करोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे नुकतेच केंद्र सरकारच्या सामान्य विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीन काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बायोमेट्रिक मशीनवरून दररोज हजारोच्या संख्येने सरकारी कर्मचारी बोटांनी पंचिंग करून हजेरी लावत असतात. त्याच माध्यमातून करोना व्हायरस पसरू शकते, यासाठी दक्षता म्हणून ही बायोमेट्रिक मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेल्वेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे महामंडळाकडून आम्हाला असे कसलेच आदेश आले नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये करोना व्हायरस बद्दल दहशत निर्माण झाली आहे.

केव्हा घेणार प्रवाशांची काळजी

रेल्वे प्रशासनाने सुध्दा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंडळाकडून उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. याद्वारे प्रत्येक रेल्वे विभागाला करोना व्हायरसविषयी जागृती, उपाययोजना याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सुचना काय असणार यांची आतापर्यत माहिती नाही. लवकरच रेल्वेकडून या सुचनाची घोषणा करण्यात येणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -