कंकणाकृती सुर्यग्रहण पाहताना काळजी घ्या

मुंबईतूनही दिसणार सुर्यग्रहण

सुर्यग्रहण

वर्ष २०१९ मधील सर्वात शेवटच सुर्यग्रहण हे तुम्हाला थोडी काळजी घेऊनच पहाव लागणार आहे. २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण आहे. यंदाच्या सुर्यग्रहणादरम्यान लाल अंगठीचा आकार पाहता येणार आहे. पण शक्यतो सुर्यग्रहण पाहताना मुंबईकरांनी सोलार फिल्टर्सचा वापर करावा असे आवाहन खगोल तज्ञांनी केले आहे.

सुर्यग्रहण पाहताना काय करू नयेसुर्यग्रहणाचे प्रतिबिंब पाण्यात पाहू नये. तसेचकाजळी धरलेल्या काचेतून सुर्यग्रहण पाहू नये.नुसत्या डोळ्यांनी पाहू नये, यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. पण सुर्यग्रहण पाहताना कोणतीहीभीती बाळगण्याचे कारण नाही. ग्रहण सुरक्षित पद्धतीने पाहिले तर कोणतीही इजा होत नाही.ग्रहण पहायच असेल तर आता बाजारात सुर्यग्रहण पाहण्यासाठी चष्मे उपलब्ध झाले आहेत. हे विशिष्ट प्रकारचे ग्रहणाचे चष्मे आहेत.

सुर्यग्रहण पाहण्याचा अनुभव हा मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरातही हे सुर्यग्रहण पाहता येईल. पण डोळ्यांची सुरक्षितता बाळगल्यास सुर्यग्रहण पाहणे ही चांगली संधी आहे.
-अरविंद परांजपे ,संचालक ,नेहरू तारांगण

इथे दिसणार सुर्यग्रहण
भारत, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, नॉदर्न मरियाना आयलँड यासारख्या देशात हे सुर्यग्रहण दिसेल. तर महाराष्ट्रात मुंबई, नांदेड, पुणे याठिकाणी सुर्यग्रहण दिसणार आहे. मुंबईत दिसणार्‍या सुर्यग्रहणात ८४.२ टक्के इतका सुर्याचा भाग हा चंद्राने व्यापला जाईल. मुंबईत सकाळी ८.०४ वाजल्यापासून सुर्यग्रहणाला सुरूवात होईल. तर १०.५५ वाजता हे सुर्यग्रहण संपुष्टात येईल.