घरCORONA UPDATEआजाराच्या संशयावरून एकाला मारहाण; मारहाणीत दुर्दैवी मृत्यू

आजाराच्या संशयावरून एकाला मारहाण; मारहाणीत दुर्दैवी मृत्यू

Subscribe

खडक पाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहाड येथील बंदर पाडा विभागात ही दुर्दैवी घटना घडली असून गणेश गुप्ता असं मारहाणीत मयत झालेल्या इसमाचे नाव असून तो येथील आपल्या परिवारासह राहत होता.

आपल्या परिवारासाठी शिधा घेऊन येत असणाऱ्या इसमाला शहाड येथील बंदर पाडा विभागात चक्कर आले असता संशयाने पछाडलेल्या तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याने या मारहाणीत जागीच मृत झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. खडक पाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शहाड येथील बंदर पाडा विभागात ही दुर्दैवी घटना घडली असून गणेश गुप्ता असं मारहाणीत मयत झालेल्या इसमाचे नाव असून तो येथील आपल्या परिवारासह राहत होता.

दुकान मालकाकडून घरी शिधा आणण्याकरता सायकलवरून परत येत असताना उन्हामुळे त्याला चक्कर आली असता बंदर पाड्यातील घराजवळील नाल्याजवळ तो पडला होता. त्याला कुठल्यातरी आजाराने ग्रासले असल्याचा संशय व्यक्त झाल्याने या संशयातून शेजारच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली असल्याची चर्चा बंदर पाड्यात सुरू आहे.

- Advertisement -

दुपारी या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता मयत इसमाचा पंचनामा करून शवविच्छेदना करिता त्याचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात देण्यात आला आहे. या संदर्भामध्ये कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश पवार यांना विचारणा केली असता, अजून काहीही माहिती उपलब्ध झाली नसून चुकीची माहिती देऊ नका असे सांगितले. दरम्यान कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना यासंदर्भात विचारणा केली असता, खडकपाडा पोलीस यासंदर्भात तपास करत असून पडताळणी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -