घरमहाराष्ट्रकामगार पुतळा परिसर सुशोभित करा, मुंबईच्या डबेवाला संघटनेची मागणी

कामगार पुतळा परिसर सुशोभित करा, मुंबईच्या डबेवाला संघटनेची मागणी

Subscribe

मुंबई –  मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली जाते आहे. बहुतांश चौकांचे नुतनीकरण केले जाते आहे. विद्युत खांबांना एलईडी लाईट बसवल्या जात आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडत आहे. हा बदल निश्चित स्वागतार्य आहे. मुंबई महानगर पालिका नुतनीकरणाअंतर्गत हाजीअली येथे असलेल्या डबेवाला कामगाराचा पुतळा परिसरही सुशोभित करण्यात यावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

दक्षिण मुंबईतील हाजीअली चौकात डबेवाला कामगार याचा भव्य पुतळा आहे. दक्षिण मुंबईमधील बाकीचे पुतळे पाहिले तर ते ठराविक चौथऱ्याच्या उंचीवर आहेत. त्यामुळे ते शोभिवंत व आकर्षक दिसतात. लांबून पाहीले तरी लोकांच्या दृष्टीस ते पडतात. पण डबेवाला कामगार याचा पुतळा थेट जमिनीवर लावण्यात आला आहे. त्यामुळे तो पुतळा जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. महानगर पालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहेत की सदर पुतळ्याला ठराविक उंचीचा चौथरा बांधा व त्या चौथऱ्यावर हा पुतळा ठेवा. जेणेकरून तो लोकांच्या दृष्टीस पडू शकेल. तसेच पुतळा परिसराचे नव्याने नुतनीकरण करण्यात यावे. रात्रीच्या वेळेत या पुतळ्यावर अंधार असतो, शक्य झाले तर या पुतळ्यावर रात्रीच्या वेळी एखाद्या प्रकाश व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

- Advertisement -

“डबेवाला कामगार” यांचा पुतळा दक्षिण मुंबईमधील हाजीअलीसारख्या अतिमहत्त्वाच्या चौकात बसवला आहे. याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. तात्कालीन मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या शुभहस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते. मुंबई महानगर पालिकेने हा श्रमसंस्कृतीचा केलेला सन्मान आहे, असे आम्ही मानतो. त्याबद्दल मुंबई महानगर पालिकेचे आम्ही आभार मानतो. मुंबई महानगर पालिका आयुक्त व प्रशासनाकडे मागणी करतो की “ डबेवाला कामगार” पुतळा हा चौथऱ्यावर बसवावा, तेथे प्रकाशयोजना करावी, पुतळा परिसराचे नुतनीकरण करण्यात यावे, जेणेकरून हा परिसर शोभिवंत व आकर्षक दिसून येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -