घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; 'या' नियमांचे करावे लागणार पालन

महाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

Subscribe

केशकर्तनालयात गेल्यास केवळ केस कापण्यास मान्यता

महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ३० जूनपर्यंत ठेवण्यात आला असून अनलॉक १ देखील सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गेले ३ महिन्यांपासून बंद असलेले केशकर्तनालये आणि सलून (Barber Shops & Salons) आजपासून सुरु झाले आहेत. दरम्यान सलून मालकांच्या मागण्यांचा विचार करत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात फक्त केशकर्तनालय सुरु करण्यास मान्यता दिली आहे. इतर सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी सुरु करण्याची परवानगी नाही, असे देखील सांगितले जात आहे. केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी यासाठी विशेष नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करून केशकर्तनालये आणि सलूनचे शॉप्स सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे.

- Advertisement -

फक्त केस कापायला परवानगी!

राज्यात २० मार्च रोजी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्वच सलून बंद ठेवण्यात आले होते. सलून व्यावसायिकांनीही गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली असून, व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाभिक संघटनांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

राज्यात सलून व्यवसायाला पुन्हा सुरूवात | Resumption of salon business in the state

राज्यात सलून व्यवसायाला पुन्हा सुरूवात | Resumption of salon business in the state

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, June 28, 2020

यावेळी सलूनमध्ये फक्त केस कापायला परवानगी देण्यात आली असून दाढी आणि इतर सेवांसाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय, केस कापणारा आणि ग्राहक अशा दोघांनाही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

  • केशकर्तनालयात गेल्यास केवळ केस कापण्यास मान्यता आहे.
  • केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग अशा सेवा देता येतील. मात्र दाढी, मसाज, फेशियल किंवा त्वचेशी निगडित सेवा देण्यास तूर्तास मनाई आहे.
  • केस कापताना ग्राहक आणि केस कापणारा अशा दोघांनीही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.
  • सलून कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रन आणि मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे.
  • खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी, इत्यादी प्रत्येक २ तासांनी सॅनिटाईज होणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरात येणारे डिस्पोजल टॉवेल, नॅपकिन बंधनकारक करण्यात आले आहेत.
  • सर्व नियमांचे पालन करुनच दुकानदारांनी दुकाने सुरु करायची आहेत.
  • जे दुकानदार कायद्याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्यात २८ जूनपासून सलून सुरू; फक्त केस कापायला परवानगी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -