मुंबई | भारतीय संस्कृती विड्याचे पानाचे खूप महत्त्व आहे. प्रत्येक पूजा आणि धार्मिक विधींसाठी विद्यांचा पानांचा वापर केला जाता. तसेच विड्याचा पानाचा वापर हा माऊथ फ्रेशनर म्हणून देखील केला जाते. पण हेच पान महागणार आहे. यामुळे विड्याचे पान खरेदी करताना विचार करावा लागणार आहे.
सध्या श्रावण महिन्या सुरू असल्यामुळे पूजा आणि धार्मिक विधींसाठी विड्यांच्या पानांची मागणी वाढत आहे. यात चेन्नई मद्रासी पान येणे बंद झाले आहे. तर देशातील काही भागात वाढलेले तापमान आणि उशिराने आलेला पावसामुळे गावरान पानांचे दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कलकत्ता पानांचे दर हे दुप्पटीने वाढले असून, गावरानाचा दर आता 100 रुपये शेकडा दराने मिळत आहे. त्याचबरोबर कोलकातेतून येणाऱ्या कलकत्ता पाने 300 रुपये शेकडा होती. आता पानांचे दर 600 रुपये झाली आहेत. कलकत्ता आणि गावरान पानांचे भाव वाढल्यामुळे पानांच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – ‘ईडी ही दहशतवादी संघटना’; संजय राऊतांचा घणाघात
विड्याची पाने महाराष्ट्र आणि तेलंगणातून येतात
बनारस आणि कलकत्ता पानांचे मळे हे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात आहेत. तर मद्रास हे पान तामिळनाडू येथून येते. महाराष्ट्रातील सांगली आणि सातार देखील पाने मिळतात. विड्यासाठी लागणार पाने ही यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ येथून येतात. त्याचबरोबर तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातून गुंडवळ आणि लंजी पानांचा मोठ्या प्रमाणात येतात.