घरमहाराष्ट्रनागपूरमी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण; सुप्रिया सुळेंच्या टीकाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण; सुप्रिया सुळेंच्या टीकाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Subscribe

खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

नागपूर – खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे. मात्र बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी खासदार सुळेंचे नाव न घेता दिले आहे.

फडणवीस म्हणाले, ‘संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की दारुच्या नशेत त्याने धमकी दिली. त्याला पुणे पोलिसांनी आयडेंटीफाय केले असून ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात कोणी कोणालाही धमकी दिली तरी, सरकार आणि पोलिस शांत बसणार नाही. कायदा कडक काम करेल.’

- Advertisement -

चेष्टा करण्याचे काय कारण?
विरोधकांना येणाऱ्या धमकीची गृहमंत्री चेष्टा करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. धमकी आल्यानंतर राऊत यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. सरकारला कळवून फायदा नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. आम्हाला आलेल्या धमक्यांची आम्ही माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात, हा स्टंट असल्याचे म्हणतात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. हा आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस म्हणाले, चेष्टा करण्याचे काय कारण आहे?

मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण
खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी फडणवीसांना झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण झाली आहे. मात्र मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. याआधी पाच वर्षे मी गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आताही जे लोक बेकायदेशीर कृत्य करतील, गैरकारभार करतील त्यांना गृहमंत्री म्हणून मी सोडणार नाही.’ असे प्रत्युत्तर देवंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या खासदार सुप्रिया सुळे
राज्यात कोयता गँग धुमाकुळ घालत आहे, छत्रपती संभाजीनगर, मुंबईत दंगली होत आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडून द्यावे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -