घरमहाराष्ट्रभाजपमुळेच मी आमदार, ठाकरे सरकारमध्ये विचारलं जात नाही; शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

भाजपमुळेच मी आमदार, ठाकरे सरकारमध्ये विचारलं जात नाही; शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

Subscribe

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विचारलं जात नाही, अशी खदखद शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांनी व्यक्त केलीय. माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.

पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही सार्वजनिकरीत्या टीका केली होती. अनिल परबांनीही मी त्याला उत्तर देणार नसल्याचं सांगत सारवासारव केली होती. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारानं पक्षाला घरचा आहेर दिलाय.

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये विचारलं जात नाही, अशी खदखद शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांनी व्यक्त केलीय. माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साधं विचारलं देखील जात नाही. घर की कोंबडी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरच कुरघोडी केलीय.

- Advertisement -

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रिपदाची संधी हुकली. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार पाटील यांनीदेखील आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली. आमदार शहाजीबाजू पाटील म्हणाले की, मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राहायला सांगितलं होतं. मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी ऐकेल. आमचा कोण विचार करेल, असंही आता वाटत नाही, असंही ते म्हणालेत.

सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मते असूनही मी आमदार झालो असे सांगताना भाजपची खूप मदत झाल्याचे त्यांनी उघड केलं. भाजपचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले ठीक मात्र 30-30 वर्षे निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनाही डावलल्याची खंत शहाजीबापू यांनी व्यक्त केली. यापूर्वीही आमदार शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदार पाटील यांचे भाजप नेत्यांशी इतर नेत्यापेक्षा चांगले सख्य आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -