घरमहाराष्ट्र'यामुळे' राजेंद्र पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार

‘यामुळे’ राजेंद्र पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार

Subscribe

अशा महान व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या कृषी विभागाने हा पुरस्कार मला दिला आहे. त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे मला अभिमानाचे वाटेल

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण राज्यपाल कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, विश्वजीत कदम, संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, राजेंद्र पवार यांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दर्शवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतकऱ्यांकडे बारीक लक्ष होते. त्यांच्या आज्ञापत्रातून आपल्याला हे समजते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका. उभ्या पिकामध्ये घोडी घालू नका. तुम्हाला स्वराज्यासाठी दोन कांड्या हव्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना राजी करून घ्या. इतका बारीक विचार करणारा आमचा राजा होता. मात्र, महाराष्ट्राचा आणि राजांचा इतिहास समजून न घेता वादग्रस्त विधाने करून शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून पुरस्कार घेणे, मला योग्य वाटत नाही, असे राजेद्र पवार म्हणाले.

- Advertisement -

महात्मा जाेतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली. तसेच, १८७० च्या दरम्यान, शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहिला. त्यात शेतकऱ्यांनी कसे राहिले पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे, पाणी उपलब्धतेसाठी काय केले पाहिजे, याबाबत विस्तृत मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात, अशा महान व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या कृषी विभागाने हा पुरस्कार मला दिला त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे मला अभिमानाचे वाटेल, असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -