Beed Accident : बीडमध्ये इनोव्हा-रिक्षाचा भीषण अपघात, ६ महिन्यांच्या बाळासह ६ जणांचा मृत्यू

जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाशिकमध्ये झालेल्या अपघातानंतर बीडमध्ये अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Beed Accident Innova-rickshaw crash 6 people died
Beed Accident : बीडमध्ये इनोव्हा-रिक्षाचा भीषण अपघात, ६ महिन्यांच्या बाळासह ६ जणांचा मृत्यू

बीडमध्ये रिक्षा आणि इनोव्हामध्ये भीषण अपघात ( Innova car accident) झाला आहे. केज अंबाजोगाईच्या रस्त्यावर भरधाव इनोव्हा आणि रिक्षा समोरासमोर आल्यामुळे जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तसेच इनोव्हा रस्त्याच्या बाजूला जाऊनही धडकली आहे. अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एका ६ महिन्याचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बीडमधील केज-अंबाजोगाईच्या रस्त्यावर (kej-Ambejogai Road) भीषण अपघाता झाला आहे. घटनास्थळावर गाड्यांचे अवशेष रस्त्यावर पडलेले दिसले. दरम्यान भरधाव इनोव्हा गाडी आणि रिक्षाची समोरसमोर धडक झाल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तसेच इनोव्हा गाडीसुद्धा रस्ता सोडून बाजूच्या झाडांमध्ये गेली असल्याचे दिसत आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातामध्ये रिक्षा आणि गाडीचे देखील नुकसान झाले असल्याचे दिसत आहे.

इनोव्हा आणि रिक्षाच्या अपघातामध्ये (beed accident news) एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील एक बालक ६ महिन्यांचे होते असे सांगण्यात येत आहे. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाशिकमध्ये झालेल्या अपघातानंतर बीडमध्ये अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह काही वेळ रस्त्यावर ठेवण्यात आले होते. यावेळी काही लोकांनी मदतीसाठी धावाधाव केली. काही लोकांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच काहींचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले, रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानी