बीड : बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या गुन्ह्यांतील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसला हा सहा दिवसांपासून फरार होता. या खोक्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. प्रयागराज येथून धूम ठोकण्याच्या तयारीत खोक्या होत्या. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या खोक्याला उचलले आहे. खोक्याला अटक कशी केली? हे जाणून घेऊया…
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून 5 ते 6 जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. यात पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.
त्यानंतर लगेच वनविभागाने खोक्याच्या घरी छापा मारून तपासणी केली. या सर्व गुन्ह्यांत खोक्या पोलिसांना हवा होता. मात्र, तो 6 दिवसांपासून सापडलेला नाही तर हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत आहे. यामुळे पोलीस करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मग पोलिसांनी आपली सूत्रे फिरवण्यास सुरूवात केली.
महाराष्ट्रात आपल्याला अटक होऊ शकते, हे खोक्याच्या लक्षात आले. त्यामुळे खोक्या बस पकडून तातडीने प्रयागराला निघाला. प्रयागराजला आपल्याला कुणी पकडू शकत नाहीत, याची खात्री खोक्याला झाली असावी. त्यानंतर प्रयागराजमधून खोक्या निघण्याच्या तयारी होती. तेव्हाच पोलिसांनी प्रयागराज विमानतळावर खोक्याला अटक केली आहे.
खोक्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन पथके तैनात केली होती. तरीही खोक्या पोलिसांनी हाती लागत नव्हता. अखेर खोक्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांना मिळाले आणि तो जाळ्यात अडकला.
हेही वाचा : धस म्हणाले, ‘त्यांनी कमळाचा नाहीतर शिट्टीचा प्रचार केला,’ पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘उलट मलाच…’