बीड : बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि जिल्ह्यात होणारे गुन्हे यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. अशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बीडमधील भाषणात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाष्य केले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतली जाणार नाही. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई होणारच,” असा विश्वास त्यांनी यावेळी बीडकरांना दिला. (Beed CM Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Murder case and crime)
हेही वाचा : Suresh Dhas : ‘मी जिवंत राहील किंवा नाही राहील, पण…’, फडणवीसांसमोर धस यांची फटकेबाजी
बीडमधील आष्टी उपसा सिंचन योजना अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी बुधवारी (5 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान, अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. “संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. माझी बीडच्या जनतेला विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.” असे ते म्हणाले. “बीडचा जो इतिहास सुरेश धस किंवा पंकजा मुंडेंनी सांगितला इतकी मोठी लोक आपल्याला बीडने दिली आहेत. तोच इतिहास पुढे जाणार असून एक गौरवशाली बीडचा इतिहास तयार करण्यासाठी आपल्या सर्वांचे जे प्रयत्न आहेत. त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहणार आहे, इतकंच या निमित्ताने सांगतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आमदार सुरेश धस यांचा ड्रीमप्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे आष्टी परिसरातील 30 गावांमधील 25 हजार 543 हेक्टर क्षेत्र म्हणजे 80 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली जाणार आहे. तिसऱ्या वेळी आमदार असताना सुरेश धस यांनी 500 एमसीएफटी पाणी कुकडी प्रकल्पातून मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागले होते. 2005 पासून आमदार धस हे उजनी धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून पाइपलाइनने खुटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी त्यांचा संकल्प होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्हा हा दुष्काळमुक्त होईल, अशा विश्वास दर्शवला आहे.