घरमहाराष्ट्रठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; जिल्हाप्रमुखांनी मारहाण केल्याचा दावा अंधारेंनी फेटाळला, नेमकं प्रकरण...

ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; जिल्हाप्रमुखांनी मारहाण केल्याचा दावा अंधारेंनी फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

गटातटाच्या वादातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर आता सुषमा अंधारे यांनी फेसबूक लाईव्ह करत मला कोणतीही मारहाण झाली नसल्याचं म्हणत मारहाणाची दावा फेटाळला आहे.

बीडमधील ठाकरे गटाचा वाद आता चव्हाचट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर आता सुषमा अंधारे यांनी फेसबूक लाईव्ह करत मला कोणतीही मारहाण झाली नसल्याचं म्हणत मारहाणाची दावा फेटाळला आहे. ( Beed Controversy in Thackeray group Andhare rejected the claim of being beaten by the district head what is the real case )

आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव यांनी काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडीओ जाहीर केला आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभेला गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला. असा उलट आरोप अंधारे यांनी जाधव यांच्यावर केला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

महाप्रबोधन सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरुन शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे याठिकाणी पाहणी करण्यासाठी शिवसैनिकांसोबत आल्या होत्या.

( हेही वाचा: मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; जे. पी. नड्डांचे कार्यकर्त्यांना आवाहन) 

- Advertisement -

ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात 20 मे रोजी होत आहे. त्यामुळे स्टेजची पाहणी करण्यासाठी अंधारे तेथे गेल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या कुठल्यातरी कारणावरुन शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीचा ही प्रकार घडलाय त्यानंतर उपस्थितांनी सोडवासोडवी केली. मात्र, अचानक गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांच्या उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीवर लाक़डी फळी भिरकावली. त्यात जाधव यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्यातून सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांनी हा आरोप फेटाळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -