घरताज्या घडामोडीCoronavirus: वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद झाला आणि...

Coronavirus: वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद झाला आणि…

Subscribe

कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडला आणि त्यातच एका कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला.

कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडला आणि त्यातच एका कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे बोले जात आहे.

नेमके काय घडले?

बीड शासकीय कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाला. यामुळे वैद्यकीय प्रशासनासह रुग्णांची मोठी तारांबळ उडाली. त्यातच कोरोना कक्षातील रुग्ण तडफडू लागले. आता काय करावे हे डॉक्टरांनाही समजत नव्हते. अखेर डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांच्या मदतीन ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये एका रुग्णाचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

संबंधित रुग्ण गेवराई तालुक्यातील असून त्या रुग्णाचा अखेर गुरुवारी रात्री मृत्यू झाला. रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना विजेची अद्यावत सोय करुन ठेवणे गरजेचे होते. परंतु, असे न झाल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.


हेही वाचा – Video : तरुणींने दिली आत्महत्येची धमकी, उडी मारणार तेवढ्यात…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -