बीड : बीडमधील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग येथील आवादा एनर्जी ही पवन ऊर्जा कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. या कंपनीतील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला आहे. हा कामगार पंजाबमधील रहिवाशी आहे. मात्र, कामगाराचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला? याची माहिती मिळाली नाही.
रचपाल मसीह या मृत कामगाराचे नाव आहे. तो पंजाबमधील गुरूदासपूर येथील रहिवाशी आहे. रचपाल हा केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग येथील आवादा कंपनीत काम करतो आहे. रचपालचा मृतदेह केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बारसमोर मृतदेह रस्तावर आढळून आला. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.
हेही वाचा : बीडमध्ये चाललंय काय! लोखंडी रॉड अन् धारदार शस्त्रानं दोन भावांची हत्या, तिसरा भाऊ…
रचपालचा मृत्यू कशामुळे झाला? यामागे घातपात आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, पोलिसांनी अद्याप कुठलीही माहिती दिली नाही.
मस्साजोग खंडणी अन् खून प्रकरण…
डिसेंबर महिन्यात मस्साजोग येथील आवादा कंपनीला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी मागितली होती. तसेच, कंपनीतील कामगारांना मारहाण सुद्धा केली होती. यावेळी मध्यस्थी आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांची घुले, चाटे आणि त्यांच्या साथीदारांनी हत्या केली होती.
तसेच, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एकूणच खंडणी आणि हत्याकांडामुळे आवादा कंपनी चर्चेत आली होती. यातच कंपनीतील कामगारा मृतदेह आढळल्यानं आवादा कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होईना! ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा सरकारला सवाल