Homeमहाराष्ट्रमराठवाडाBeed Crime : सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनावरच संशय, अंजली दमानियांनी केले...

Beed Crime : सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनावरच संशय, अंजली दमानियांनी केले आरोप

Subscribe

बीड : काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर वाल्मिक कराडवर या हत्येबाबत आरोप करण्यात आले. या प्रकरणावर गेल्या दिवसात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक दावे आणि आरोप केले आहेत. अशामध्ये आता त्यांनी ट्विट करत एक नवा दावा केला आहे. त्यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जनबाबत अनेक आरोप केले आहेत. तसेच त्यांनी आता हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनावरही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. (Beed Crime Santosh Deshmukh murder case anjali damania tweet)

हेही वाचा : Ajit Pawar : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण… 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अंबेजोगाई येथे असलेले हॉटेल पियुष इन कोणाचे आहे? मला मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अशोक थोरात यांचे हे हॉटेल आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन असून यांचीही कसून चौकशी व्यायला हवी.” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पुढे म्हंटले आहे की, “डॉ. अशोक थोरात यांच्याच अंतर्गत संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. त्यानंतर वाल्मिक कराडला दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. तेथील 11 रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तसेच, हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झाले आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.

“सर्व गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे जामीन. आता त्यासाठी मेडिकल ग्राऊंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अतिदक्षता विभागामध्ये दाखल केल्याचे दाखवले जात आहे. त्याला काहीही झाले नाही. खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना. अशा लोकांना कोणतीही दया माया न दाखवता त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत, त्याचे अहवाल सार्वजनिक करा. ते व्यवस्थित, ठणठणीत आहेत. दोन तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून ते ठणठणीत असल्याची खात्री करून त्यांना आर्थर रोड तुरुंगात हलवण्याची माझी मागणी आहे” असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.