घरताज्या घडामोडीभयंकर! बीड हादरले, अल्पवयीन मुलीवर पोलिसासह ४०० जणांचा बलात्कार

भयंकर! बीड हादरले, अल्पवयीन मुलीवर पोलिसासह ४०० जणांचा बलात्कार

Subscribe

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यात ४०० जणांनी बलात्कार केला. यात पोलिसाचाही समावेश असल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. या लैंगिक शोषणातून पीडितेला दिवस गेले असून ती दोन महिन्यांची गर्भवती आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी पिडितेच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वीच तिचे एका तरुणाशी लग्न लावून दिले. पण काही दिवसांनंतरच पतीने व सासरच्यांनी तिला मारझोड करण्यास सुरुवात केली. अखेर या छळाला कंटाळून पिडितेने घरातून पळ काढला आणि ती वडिलांकडे राहायला आली. पण नवऱ्याला सोडून आल्याने तिच्या वडिलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. तसेच नातेवाईकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली. यामुळे ती अंबाजोगाई येथे बसस्थानकावर भीक मागू लागली. जेवायला अन्न नाही आणि राहायला घर नाही अशा परिस्थितीत कधी बसस्टॉपवर तर कधी फूटपाथवर तर कधी मिळेल तिथे ती राहत होती. याचाच गैरफायदा घेत अनेकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर बालकल्याण समितीला दिलेल्य निवेदनातही तिने पोलिसांकडे तक्रार करण्यास गेल्यावर एका पोलिसाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर बालविवाह प्रतिबंध कायदा, विनयभंग कलम, पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -