बीड : बीड हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. मी ओबीसी आहे. माझी थेट मागणी आहे, या वाल्मिक कराडला तुरुंगात टाका. वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. (Beed Morcha For Santosh Deshmukh NCP MLA Sandeep Shirsagar Slams Dhananjay Munde On Walmik Karad)
नेमकं काय म्हणाले संदीप शिरसागर?
“विन मीलच्या प्रकरणात असलेला सुरक्षारक्षक हा बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते. त्यावेळी खंडणीसाठी विणमील कंपनीत गेलेल्या वाल्मिक कराड याच्या गुंड सहकाऱ्यांनी त्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली. सुरूवातीला सुरक्षारक्षकाने त्या गुंडाना आढवलं पण तरीही त्यांनी त्याला मारलं. मी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाष्य केलं. बीड हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. मी ओबीसी आहे. माझी थेट मागणी आहे, या वाल्मिक कराडला तुरुंगात टाका”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
“या घटनेनंतर गावातील लोकांना जिल्ह्यातील सर्व आमदार भेटले. या भेटीदरम्यान गावकऱ्यांना या आमदारांनी आश्वाशित केलं की हिवाळी आधिवेशनात या घटनेबाबात आवाज उठवू. त्यानुसार, सर्व आमदारांनी वाल्मिक कराडबाबत आवाज उठवत भाषणं केली. मी विरोधी पक्षाच्या बाकावर होतो. पण सुरेश धस भाजपमध्ये आणि प्रकाश सोळंकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले नेते आपल्यासोबत आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले अभिमन्यू पवार हे सुद्धा आपल्यासोबत असून अधिवेशनात त्यांना आपल्याला साथ दिली”, असेही संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.
“राजकारण या घटनेमध्ये आणायचं नाही असं आम्ही सभागृहात ठरवलं होतं. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शब्द दिला होता की, आरोपी कोणी असो त्याला सोडणार नाही. त्याला अटक केली जाईल. त्यामुळे काळजी करू नका सर्वपक्षीय नेते म्हणत आहेत की, या वाल्मिक कराडला तुरुंगात टाका”, असेही संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.
“19 दिवस झाले तरी वाल्मिक कराडवर कारवाई केली जात नाही. पण वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप शिरसागर यांनी केला. त्यामुळे माजी मागणी आहे, या घटनेत 302 मध्ये त्याच्या कारवाई करा, त्याला अटक करा, ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे”, असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी सरकारला धारेवर धरले.
“आपल्याला मोर्चापर्यंतच थांबायचा नाही तर, या कुटुंबियाना न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवणारच. सुरेश धस तुम्हाला विनंती आहे की, हे प्रकरण जास्त वाढू देऊ नका. आम्ही आता जरी वेगळ्या पक्षात असलो तरी या कुटुंबियांनी न्याय देऊनच राहू”, असा इशाराही यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला.
हेही वाचा – Beed : मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कुणाचा खून झाला असता तर झोप आली असती का? जरांगेंचा फडणवीसांना सवाल