धाराशिव – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथे निषेध मोर्चा निघाला आहे. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी मागणी केली आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– अशा लोकांना समाजात राहण्याचा अधिकार नाही
– असे लोक समाजात राहता कामा नये, त्यांना फाशी झालीच पाहिजे,
– देशमुख यांचे मुळगाव बार्शीमधील आहे, ते आजोळी मस्साजोगला गेले तीन जिल्ह्यांशी त्यांचा संबंध आहे. त्यांच्या मारकऱ्यांना फाशी होईपर्यंत धाराशिवकर शांत बसणार नाही
– परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी देखील धाराशिवचा होता. त्याचे कुटुंब उदरभरणासाठी परभणीला गेले. आता पर्यंत त्यांच्या हत्येप्रकरणी कोणावरही एफआयआर दाखल नाही. न्याय कोणाकडे मागायचा
– कुठल्याही समाजातील व्यक्तीची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो.
– हत्या करणाऱ्याची जात नसते, ती वृत्ती असते.
– सत्तेची साथ मिळाली की अशी वृत्ती वाढीला लागते. ही वृत्ती ठेचली पाहिजे.
– सुरेश धस यांना मागणी आहे की हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालले पाहिजे.
– कर्म हे माणसाला सुटी देत नाही. तुम्ही पोलीसांसमोरुन गु्न्हे लपवू शकता पण कर्मापासून सुटी नाही.
– बजरंग सोनवणेंचंही अभिनंदन, त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मानवाधिकार आयोगाने वेगळा गुन्हा दाखल केला आहे. मात्र तारीख पे तारीख नको. या प्रकरणात जलद गती न्यायालयात खटला चालवला जावा.
हेही वाचा : Beed Murder : संतोष देशमुख हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट; मकोकामधून वाल्मिक कराडला वगळले