घर महाराष्ट्र सरकारने माफी मागावी; जालना प्रकरणावरून गोदापात्रात तरुणांच्या उड्या

सरकारने माफी मागावी; जालना प्रकरणावरून गोदापात्रात तरुणांच्या उड्या

Subscribe

मराठा आंदोलकांवर सराटे अंतरवलीत झालेल्या बेछुट लाठीमारीचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून आज गेवराई तालुक्यातील गोदाकाठी गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत योणाऱ्या सर्व गावच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन करत गोदापात्रात उड्या घेतल्या.

गेवराई:मराठा आंदोलकांवर सराटे अंतरवलीत झालेल्या बेछुट लाठीमारीचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून आज गेवराई तालुक्यातील गोदाकाठी गुळज पंचायत समिती गणाअंतर्गत योणाऱ्या सर्व गावच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन करत गोदापात्रात उड्या घेतल्या. यावेळी 200 पोलिसांच्या फौजफाट्यासह दंगल नियंत्रण पथक आणि एनडीआरएएफचे पथक घटनास्थळी तळ ठोकून होते. आंदोलकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सराटे अंतरवलीत येऊन महिलांची माफी मागावी, अशी प्रमुख मागणी लावून धरली तर दुसरीकडे निपाणी जवळका येथे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अत्यंविधी केला. या आंदोलनातून सरकारविरोधात सर्वसामान्य मराठा समाजात किती संताप आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (Beed news Godapatra jump by protesters in Gulj agad )

मागच्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणास हिंसक वळण लागल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी बंद पुकारून आंदोलनास पाठिंबा देण्यात येत असून, काही ठिकाणी जाळपोळ होत आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या पट्ट्यात या आंदोलनाची धग अधिक दिसून येत आहे.

- Advertisement -

गोदाकाठच्या गुळज गावात मुक्कामी असणारी बस आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकली तर धोंडराई फाटा येथे देखील बस जाळून टाकण्यात आली. अजून ही आंदोलक थांबले नसून ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत पाठिंबा दर्शवत असल्याचं दिसून येत आहे. गुळज व पंचक्रोशीतील शेकडो मराठा समाज बांधव रविवारी सकाळी थेट गुळज येथील नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यास उतरले. याची माहिती प्रशासनाला मिळताच घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.

यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला असता याठिकाणी बीडचे अधिकारी व गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी प्रशासनाची धावपळ झाल्याचं दिसून आलं.

- Advertisement -

(हेही वाचा: ‘भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान’; पंकजा मुंडेंचा दावा )

- Advertisment -