Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र करुणा शर्मांच्या मुंबईतील घरी बीड पोलिसांचं सर्च ऑपरेशन

करुणा शर्मांच्या मुंबईतील घरी बीड पोलिसांचं सर्च ऑपरेशन

बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं असून करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे.

करुणा शर्मा प्रकरणात तपासासाठी बीड पोलिसांचं पथक मुंबई दाखल झालं होतं. हे पथक सकाळी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने पुढील तपास करतंय. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. करुणा शर्मा सध्या बीड पोलिसांच्या अटकेत आहेत. करुणा शर्मा परळीत गेल्या असताना त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडले होते. याप्रकरणी शर्मा यांच्यावर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. तर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी गाडी चालकावर गुन्हा दाखल आहे. सध्या करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. अंबेजोगाई न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

करुणा शर्मा यांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार

- Advertisement -

करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी ही घोषणा केली आहे. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

 

- Advertisement -