घरताज्या घडामोडीधक्कादायक! १७ वर्षाच्या युवकाची आत्महत्या

धक्कादायक! १७ वर्षाच्या युवकाची आत्महत्या

Subscribe

आईवडिलांनी ऑनलाइन क्लाससाठी टॅब न दिल्याने नाराज झालेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरता सध्या शाळा, कॉलेजमधील अभ्यास हा घर बसल्या ऑनलाईन शिकवला जात आहे. मात्र, या ऑनलाईन क्लाससाठी आईवडिलांनी टॅब न दिल्याने एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.

नेमके काय घडले?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. त्यामुळे आता दहावीचा निकाल लागण्यासाठी काहीच दिवस होते. तसेच आता पुढील शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आपल्याला मोबाईलची आवश्यकता असल्याने त्यांने पालकांकडे टॅबची मागणी केली. त्यावर ते म्हणाले की, सध्या पेरणीच्या कामाची लगबग असल्याने थोडे दिवस थांब आपण टॅब घेऊ. त्यानंतर घरातील सर्वजण शेतावर निघून गेले. मात्र, नाराज झालेल्या अभिषेकने मागचा पुढचा कोणताही विचार न करता दुपारच्या वेळेस घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह श्वविच्छेदनासाठी गेवराईतील उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वेद्वारे जिल्ह्यासाठी साडेपाच लाख टन खतसाठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -