बीड – बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढत्या गुन्हेगारीसोबतच जातीय तणाव देखील निर्माण होत आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कारणामुळे आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून पोलीस शिपायापर्यंत सर्वांनी फक्त पहिल्या नावाचाच वापर करायचा आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या नाम फलकापासून (नेमप्लेट) टेबलवरील आणि वर्दीवर लावण्यात येणाऱ्या नेमप्लेटमधून आडनाव काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस अधिकारी आणि पोलिस शिपाई यांनी फक्त फक्त पहिल्या नावाचा वापर करावा असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.
आम्ही सर्वांसाठी खाकी आहोत…
बीड जिल्ह्यात बहुतेक तालुक्यात तिथल्याच गावांमधील तरुण पोलीस खात्यात आहेत. पोलीस खात्यामध्ये विविध जाती-धर्मांचे तरुण भरती होतात. ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. आम्ही पोलीस खात्यात काम करतो म्हणजे देशसेवेचे काम करतो त्यामुळे आम्हाला कुठलीच जात किंवा धर्म नाही. आमचा कोणताही धर्म नाही. आम्ही कोणत्याही नागरिकाला त्याची जात-धर्म विचारत नाही. त्याची जात धर्म पाहून न्याय देण्याची पोलिसांची भूमिका नसते. जातीमुळे कर्तव्यात कसूर होऊ नये म्हणून आम्ही कर्तव्यातून जात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वांसाठी खाकी आहोत. त्यामुळे आडनाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी म्हटले आहे.
बीडमध्ये सध्या जातीय तणाव वाढला आहे. त्यामुळे पोलिस कोणत्या जातीचा आहे हे त्याच्या आडनावावरुन ओळखले जाते. त्यामुळे आडनाव काढून टाकण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे बीडमध्ये पोलिसांना आता फक्त त्यांच्या पहिल्या नावाने ओळखले जाणार आहे. नवनीत कॉवत यांचा निर्णय स्वागतार्ह्य आहे, याचा किती परिणाम होतो ते पाहावे लागेल.
हेही वाचा : Khokya Arrest : अटकेनंतर खोक्याच्या अडचणी वाढल्या, वनविभागाकडून या प्रकरणी होणार मोठी कारवाई