घरताज्या घडामोडी'पप्पा तुम्ही परत या...',चिमुरड्याचे दु:ख; धनंजय मुंडेंनी दिला मदतीचा हात

‘पप्पा तुम्ही परत या…’,चिमुरड्याचे दु:ख; धनंजय मुंडेंनी दिला मदतीचा हात

Subscribe

बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीत राहणाऱ्या एका चिमुरड्याचा फोटो आणि त्यांनी वडिलांवर लिहिलेल्या निबंधाची पत्र सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्हायरल पोस्ट पाहून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मदत जाहिर केली आहे.

बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीत राहणाऱ्या १० ते ११ वर्षाच्या मुलाचा फोटो आणि त्यांनी वडिलांवर लिहिलेल्या निबंधाची पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एकीकडे वडिलांचे डोक्यावरुन छत्र हरपले आहे. तर दुसरीकडे आई अपंग, अशा या चिमुरड्यावर आपल्या वडिलांवर पत्र लिहिण्याची वेळ आली आहे. या चिमुरड्याने हा निबंध लिहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. या चिमुरड्याला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत जाहिर केली आहे.

वाळकेवाडीत राहणारा मंगशे वाळके हा मुलगा इयत्ता चौथीत शिकणारा आहे. या मुलांनी चक्क आपल्या वडिलांवर निबंध लिहित ‘पप्पा तुम्ही परत या’… अशी हाक मारली आहे. सध्या या मुलाचा हा निबंध सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

मंगेशने लिहिलेला निबंध

“माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझे लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा १८ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या, आई अपंग आहे त्यामुळं मला आईला मदत करावी लागते”.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांनी जाहिर केली मदत

सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ मंगेशला मदत जाहीर केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत १.५ लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५% बसचा पास आणि दिव्यांग महामंडळामार्फत आणखी काही योजना लागू करून भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मायेचे छत्र हरपून देणार नाही…मंगेश वाळके या चिमुकल्याच्या लेखणीतून साकारलेले 'माझे पप्पा' (सोबत या निबंधाची प्रत…

Dhananjay Munde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜನವರಿ 19, 2020


हेही वाचा – शिवसेना हा विचारधारा, मूल्य नसलेला पक्ष – देवेंद्र फडणवीस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -