घरमहाराष्ट्रबीडमध्ये सेफ्टीक टँकची दुरुस्ती करताना दोघांचा गुदमरुन मृत्यू

बीडमध्ये सेफ्टीक टँकची दुरुस्ती करताना दोघांचा गुदमरुन मृत्यू

Subscribe

परळी शहरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर भागातील माणिक पोपळघट यांच्या घरी सेफ्टीक टँकच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. या दुरुस्ती दरम्यान दोन मजूरांचा मृत्यू झाला.

सेफ्टीक टँकच्या दुरुस्तीचे काम करत असताना गुदमरुन दोन मजूरांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बीडच्या परळी शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. परळीच्या शिवाजीनगर भागात मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये आणखी तीन मजूर गंभीर आहे. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना 

परळी शहरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर भागातील माणिक पोपळघट यांच्या घरी सेफ्टीक टँकच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. ५ मजूर दुरुस्तीचे काम करत होते. सेफ्टीक टँकच्या आतमध्ये हे मजूर उतरले असता त्यामधील २ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला तर इतर तीन जण बेशुध्द पडले. बेशुध्द पडलेल्या मजूरांना ताबडतोब अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisement -

परळी पोलिसांकडून तपास सुरु 

रात्री बारा ते दोनच्या सुमारास माणिक पोपळघट यांच्या सेफ्टीक टँक उपसण्याचे काम करत होतेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये अर्जुन रमेश भालेराव (वय २०), विशाल शिवाजी लांडगे (वय २०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार्तिक भीमा कांबळे, शिवाजी यादव लांडगे, विशाल रमेश भालेराव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा तपास परळी पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

ड्रेनेजमध्ये गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -