संजय राऊतांना पुन्हा होणार अटक? ‘या’ प्रकरणात बेळगाव कोर्टाकडून समन्स जारी

belgaum court has issued summons to sanjay raut for making provocative speech belgaum

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जामीनावर सुटलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत आले आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावला आहे. या समन्सनुसार राऊतांना 1 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी बेळगावात 30 मार्च 2018 रोजी राऊतांनी प्रक्षोभक भाषण केलं होत, याप्रकरणीच राऊतांना समन्स जारी केला आहे. या समन्सनुसार आता संजय राऊत 1 डिसेंबरला कोर्टात हजेरी लावणार आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरुमध्ये महाराष्ट्रातील सांगलीबाबत एक मोठं विधान केलं होतं. ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जत तालुक्यावर (Jat Taluka) दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असे म्हटले होते. यामुळे राज्यात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर वातावरण पेटले आहे. यात आता राऊतांना समन्स मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मला अटक करण्याचा कट, समन्सनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सीमा भागातील लोकांच्या मागे शिवसेना उभी आहे, सीमा भागातील कर्नाटक सरकारने हल्ले केले किंवा कायद्याची भिती दाखवत तुरुंगात टाकले, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. मी केलेल्या भाषणात प्रक्षोभक काय आहे? हे मला अजून माहित नाही. 2018 मधील भाषणाची दखल घेत मला समन्स पाठवत कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. याचा अर्थ मी तिथे कोर्टात जावं आणि कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा, अशी माझ्याकडे माहिती आली आहे,

राऊत पुढे म्हणाले की, मी कोर्टात गेल्यावर मला अटक करुन बेळगावच्या तुरुंगात टाकण्याचं कारस्थान गेल्या दोन दिवासांपासून सुरु असल्याचे माझ्य़ा कानावर येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र संदर्भात चार दिवसांपूर्वीच आहे. महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीकडील भाग तोडून कर्नाटकात घेण्यासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका विषयाला तोंड फोडलं आहे. त्याचवेळी आमच्या सारखी जी लोक आहे. जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. त्यांना कायदेशीर बाबीत गुंतून बेळगावात बोलून त्यांच्यावर हल्ले करायचे, असे कारस्थान मला शिजताना दिसत आहे, याची दखल महाराष्ट्र सरकराने घ्यायला पाहिजे, तसेच शिवसेना ही सीमा बांधवांसाठी कटिबद्ध असल्याचेही विधान त्यांनी केलं आहे,

शिवसेनेने सीमा बांधवांसाठी 69 हुतात्मा दिले आहेत. मी बेळगावचा 70 वा हुतात्मा व्हायला तयार आहे, बाळासाहेब ठाकरेंनी सीमा प्रश्नांसाठी तीन महिने तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी त्यावेळेला तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्यामुळे ती धग आमच्या मनात कायम आहे. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक होणार असेल तर मी नक्कीच बेळगावला जाईल. असही राऊत म्हणाले.


विरारमधील बँक मॅनेजरचा फरार मारेकरी पुन्हा गजाआड, साथीदारही ताब्यात