घरमहाराष्ट्रबेळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौरपद भाजपकडे

बेळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौरपद भाजपकडे

Subscribe

महापौर व उपमहापौरपदाच्या निववडणुकीसाठी भाजपच्या शोभा सोमण यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी पक्षातील कोणत्याच नगरसेवकांने अर्ज भरला नाही. त्यामुळे शोभा सोमण यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून रेश्मा पाटील यांनी अर्ज भरला. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला. रेश्मा पाटील यांना ४२ तर वैशाली भातकांडे यांना केवळ चार मते मिळाली. 

 

बेळगावः बेळागाव महापालिकेतील महापौर, उपमहापौरपद भाजपच्या पारड्यात पडले आहे. महापौर पदी शोभा सोमण तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. बेळगाव पालिकेची निवडणूक होऊन १४ महिन्यांनी या पदांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.

- Advertisement -

महापौर व उपमहापौरपदाच्या निववडणुकीसाठी भाजपच्या शोभा सोमण यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी पक्षातील कोणत्याच नगरसेवकाने अर्ज भरला नाही. त्यामुळे शोभा सोमण यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून रेश्मा पाटील यांनी अर्ज भरला. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला. रेश्मा पाटील यांना ४२ तर वैशाली भातकांडे यांना केवळ चार मते मिळाली.

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला सहा जण अनुपस्थित होते तर तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आले. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यावेळी वादही झाला. तरीही त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.

- Advertisement -

बेळगाव महानगरपालिकेसाठी सप्टेबंर २०२१ मध्ये निवडणूक झाली. एकूण ५८ प्रभागांसाठी ही निवडणूक झाली. ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवार रिंगणात  होते. यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले.   भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला फक्त चारच जागांवर विजय मिळाला आहे. या निकालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. बेळगाव झांकी है, मुंबई अभी बाकी है आणि ती आम्ही मिळवणारच. ज्या पद्धतीने आम्ही हैदराबादची निवडणूक लढलो. १-२ नगरसेवकावरुन ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली नव्हती. गेली १४ महिने ही पदे रिक्ते होती. अखेर सोमवारी यासाठी निवडणूक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे भाजपनेच बाजी मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -