Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा; महाराष्ट्र एकीकरण समितीचं पानीपत

बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा; महाराष्ट्र एकीकरण समितीचं पानीपत

Related Story

- Advertisement -

बेळगाव महानगरपालिकेवर (Belgaum Municipal Corporation Election) भाजपचा झेंडा फडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण ३३ जागांसह बेळगाव महानगरपालिकेत भाजपला सप्ष्ट बहुमत मिळालं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं पानीपत झालं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार फक्त चारच जागांवर विजयी होऊ शकले आहेत.

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बेळगाव महानगरपालिकेच्या निकालावर लागून होतं. या निवडणुकीत भाजपनं ३३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मतमोजणी अद्याप सुरु आहे. दरम्यान, भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता. भाजपच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं आहे. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.

- Advertisement -

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु झाली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ५८ प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांना शिवचरित्र पाठवू – संजय राऊत


 

- Advertisement -