Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गणेशोत्सवात 'बेस्ट'च्या हेरिटेज बसद्वारे भाविकांना मुंबईतील गणेश दर्शन

गणेशोत्सवात ‘बेस्ट’च्या हेरिटेज बसद्वारे भाविकांना मुंबईतील गणेश दर्शन

Subscribe

दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरीता बेस्ट उपक्रमाद्वारे खुल्या दुमजली बसद्वारे 'हेरिटेज दूर बससेवा' चालवली जाते. यंदा 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.

दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरीता बेस्ट उपक्रमाद्वारे खुल्या दुमजली बसद्वारे ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालवली जाते. यंदा 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तसेच, 8 सप्टेंबरपर्यंत मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. (best additional service for Ganesh festival in mumbai)

या 10 दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांतील बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता, बेस्टने ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचाही निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

- Advertisement -

बेस्टतर्फे दक्षिण मुंबईत ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालवली जाणार आहे. विशेषत: फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळेस भेट देण्याकरिता ही हेरिटेज टूर बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हेरिटेज दुमजली बसगाड्या रात्री 10 वाजतापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत तासांच्या प्रस्थांतराने चालविल्या जाणार आहे.

या बससेवेची सुरुवात म्युझियम येथून सुरु होऊन गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईट, मरिन चर्चगेट महर्षि कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, मुंबई सेंट्रल, भायखळा जिजामाता उद्यान, तालबाग आणि परत मायखळा, मुंबई सेंट्रल साडदेव, बनौरोड मरिन लाइन्स मेट्रो सिनेमा उत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुन्हा म्युझियम पर्यंत बससेवा हॉप ऑन हॉप ऑफ या पध्दतीने कार्यान्वित असेल.

- Advertisement -

या बससेवेसाठी वरच्या व खालच्या मजल्यासाठी अनुक्रमे 150 रुपये आणि 75 रुपये असे तिकीट दर असणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कृपया बेस्टच्या हेल्पलाईन क्रमांक 18227550 टोल फ्रि आणि 22-24190117 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

बेस्टच्या अतिरिक्त बससेवा

बसमार्ग क्र.                                               प्रस्थान

पासून                                          पर्यंत

१ मर्या.             इलेक्ट्रिक हाऊस / कुलाबा आगार              बांद्रा रेक्लेमेशन बसस्थानक

४ मर्या.            ओशिवरा आगार                                   सर जे. जे. रुग्णालय

७ मर्या.            विक्रोळी आगार                                    सर जे. जे. रुग्णालय

८ मर्या.            शिवाजी नगर                                       सर जे. जे. रुग्णालय

६६ मर्या.          राणी लक्ष्मीबाई चौक                               कुलाबा आगार

२०२ मर्या.         माहीम बसस्थानक                                बोरीवली स्थानक (पश्चिम)

सी-३०२           राणी लक्ष्मीबाई चौक                              महाराणा प्रताप चौक (मुलुंड)

सी-३०५           बॅकबे आगार                                      धारावी आगार

सी- ४४०          माहीम बसस्थानक                               बोरीवली स्थानक (पूर्व)

31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीदरम्यान गणेशभक्तांना मुंबईतील विविध ठिकाणी भेट देणे सोयीस्कर व्हावे. या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने रात्रीच्या वेळेस 25 विशेष बसगाड्यांचे प्रवर्तन करण्याचे ठरविले आहे. या विशेष बससेवेचे प्रवर्तन खालील बसमार्गांवर रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये दर एक तासाच्या प्रस्थानांतराने केले जाणार आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मदत वितरित करण्याचा निर्णय; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -