Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रBEST Bus : मतदानादिवशी पहाटे 4 पासून धावणार बेस्ट; आयुक्तांनी दिले हे...

BEST Bus : मतदानादिवशी पहाटे 4 पासून धावणार बेस्ट; आयुक्तांनी दिले हे आदेश

Subscribe

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. याआधी बेस्टने एक महत्त्वाची घोषणा केली. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी मुंबई प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. यावेळी बेस्टने मतदानादिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जागा फेऱ्या चालवण्याचे निर्देश दिले आहेत. (BEST Bus will run from early morning 4 am at Election Day)

हेही वाचा : Shiv Sena Vs Shiv Sena : मंत्री सत्तारांची उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची भाषा; अंबादास दानवेंनी असे दिले प्रत्युत्तर… 

- Advertisement -

बेस्टच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे. दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी लो फ्लोअर डेक बसही उपलब्ध असणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना वेळेत कर्तव्यावर पोहोचता यावे, यासाठी जादा बस चालवण्यात येणार आहेत. या बस फेऱ्यांचे नियोजन सोमवारपर्यंत केले जाणार आहे. ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता यावे, यासाठी बेस्टची बससेवा उपलब्ध असणार आहे. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह उपनगरांत उपलब्ध असणार आहे. मतदारांनी मतदान करावे, असे आव्हानदेखील करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेनेही मतदानादिवशी केले बदल

मतदानादिवशी मध्य रेल्वेनेदेखील उशिरापर्यंत लोकल धावणार असल्याची आधीच जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने उशिरापर्यंत गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मतदानादिवशी पहाटे 3 वाजता डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल आणि अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी या मार्गावर धावणार आहेत.

- Advertisement -

मेट्रोच्या वेळापत्रकातही बदल

मतदानादिवशी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1च्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी मेट्रो पहाटे 4 वाजता धावणार असून मेट्रो 1 ची सेवा मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने ‘मेट्रो वन’ने केलेल्या विनंतीनंतर निर्णय घेतला.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -