घरताज्या घडामोडीCoronavirus: बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Coronavirus: बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १ कोटीची मदत करण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची मागणी.

बेस्ट उपक्रमातील अभियांत्रिकी विभागात मुकादम या पदावर काम करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. या घटनेमुळे बेस्ट कामगारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच बेस्ट वर्कर्स युनियनकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांना १ कोटीची तत्काळ मदत करण्याची मागणी बेस्ट प्रशासनाने केली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. आता बेस्टमध्ये एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या ३६ असून त्यामधील २ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला तर ४ जणांनी कोरोनाला हरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मृत्यू झालेला कर्मचारी बेस्टच्या बॅकबे आगारातील असून त्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर २२ एप्रिलपासून हॉस्पिटलमध्ये वैदयकीय उपचार सुरु होते. त्या कर्मचाऱ्याचा रविवारी ३ मे रोजी मृत्यु झाला. तसेच मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या वारसाला तातडीने बेस्टमध्ये सेवेत घ्या. तसेच विविध शासकीय विमा योजनांचा आधार घेऊन आणि बेस्टने स्वताच्या निधीतून एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या कुटूंबीयांना तत्काळ द्यावे, अशा मागणीचे पत्र बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे यांना पाठवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: पोलिस हवालदार आणि टिकटॉक स्टार अर्पिता चौधरींना कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -