घरताज्या घडामोडीBEST Mobile Bill Center : मुंबईकरांसाठी बेस्ट सुविधा! रिचार्ज, बिल भरणे झाले...

BEST Mobile Bill Center : मुंबईकरांसाठी बेस्ट सुविधा! रिचार्ज, बिल भरणे झाले सोपे

Subscribe

बेस्ट उपक्रमाने शहर भागातील नागरिकांना मालमत्ता कर, फास्ट टॅग रिचार्ज, मोबाईल बिल भरण्यासाठी “मोबाईल व्हॅन”द्वारे वन सेंटर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच शहरातील चार ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

कुलाबा, बेस्ट भवन येथे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. बेस्टच्या वीज ग्राहकांना वीज देयके सुलभ रीतीने प्रदान करता यावीत, या दृष्टीने भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळ यांच्याद्वारे डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत एक्स पे या संस्थेद्वारा संचालित बीबीपीएस प्रणालीचा वापर करून मोबाईल देयक भरणा केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

या प्रणालीद्वारे वीज देयकांसोबतच पाणी, मालमत्ता देयके, इतर महापालिका सेवा कर, फास्ट टॅग रिचार्ज, गॅस, डीटीएच, क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, दूरध्वनी, भ्रमणध्वनी देयके, केबल व ब्रॉडबॅंड सेवांचे देयके प्रदान करण्यासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मोबाईल व्हॅनद्वारे देयकांचा भरणा करता येऊ शकतो, अशी सेवा उपल्बध करणारी बेस्ट उपक्रम ही भारतातील एकमेव संस्था आहे. लवकरच अशा आणखी चार मोबाईल व्हॅनद्वारे सदर सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. सदर मोबाईल व्हॅन वरळी, अँटॉप हिल, शिवाजी पार्क, रे रोड, नायगाव भोईवाडा, कफ परेड, नाना चौक आणि कुलाबा येथील गीता नगर या ठिकाणी कार्यरत राहील. याप्रसंगी एनपीसीआय ( NPCI ) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नुपूर चतुर्वेदी एक्स या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : अनिल देशमुख भ्रष्टाचाराचे मास्टरमाईंड, जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड करतील; ईडीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -