बेस्ट उत्पन्न वाढीसाठी पुढील वर्षांपासून देणार ‘टॅक्सी सेवा’ ; ओला, उबेरला टक्कर

मकर संक्रांतीला बेस्टच्या ताफ्यात येणार ५० डबल डेकर बसगाड्या, जून २०२३ पर्यंत ५ हजार ई - बाईक

police report that no evidence was found in another case involving rape allegations against bjp mla ganesh naik

मुंबई  -: मुंबईतील खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे बेस्ट उपक्रम एसी बसगाड्या, बाईक सेवेनंतर आता उत्पन्न वाढीसाठी व मुंबईकरांना आणखीन एक बेस्ट सेवा देण्यासाठी भाडे तत्वावरील ‘टॅक्सी सेवा’ पुढील वर्षापासून सुरू करणार आहे. त्यामुळे महागडी सेवा देणाऱ्या ओला व उबेर टॅक्सी सेवेला बेस्टची ‘टॅक्सी सेवा’ पंगा घेऊन टक्कर देणार आहे. तर टॅक्सीचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या माफक दरातील सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भातील माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. बेस्ट उपक्रम उत्पन्न वाढीसाठी सध्या कसोशीने काहींना काही प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये आतापर्यंत बेस्टला अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र बेस्टने आपली आशा सोडलेली नाही. बेस्ट उपक्रम पुढील वर्षात जून महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत भाडे तत्त्वावरील ५०० ‘इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा’ आणणार आहे. ओला, उबेर व अन्य टॅक्सी सेवेच्या तुलनेत बेस्टच्या टॅक्सीचे भाडे माफक असणार आहे.

मकर संक्रांतीला ५० डबल डेकर बसगाड्यांची भेट

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यात ५० नवीन डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबईत बेस्टच्या जुन्या ४५ डबलडेकर बसगाड्या आता इतिहासजमा होणार म्हणजे भंगारात काढण्यात येणार आहेत. तर नवीन एसी डबलडेकर बसमधून मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.

जून २०२३ पर्यंत ५ हजार ई – बाईक

बेस्ट उपक्रमाने मुंबईतील वाहतूक कोंडीमधूनही सुरळीत प्रवास होण्यासाठी बेस्टच्या बसमधून बस थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ई- बाईक सेवा सुरू केली आहे. या बाईक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टने वागो कंपनीच्या माध्यमातून ही ई – बाईक सेवा मध्यंतरी सुरू केली. सध्या मुंबईत एक हजार ई – बाईक प्रवाशांच्या सेवेत असून जून २०२३ पर्यंत ई बाईकची संख्या ५ हजारांवर नेण्यात येईल, असे ही महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बेस्टची महापालिकेकडे २,७७४ कोटी रुपयांची मागणी

बेस्ट उपक्रमाला प्रवाशांच्या सेवेत नवीन एसी बस गाड्यांची सेवा उपलब्ध करण्यासाठी ७०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच, बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी आणि अन्य कामांसाठी किमान २ हजार कोटी रुपयांची, अशी एकूण २,७७४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मुंबई महापालिकेने २,७७४ कोटी रुपये अनुदान स्वरूपात बेस्ट उपक्रमाला द्यावेत, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली असल्याची माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी यावेळी दिली.

वॉटर टॅक्सी सेवेसाठी प्रयत्नशील

मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट उपक्रम प्रयत्नशील असल्याचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.जहाज मंत्रालय सागरमाला प्रकल्पावर मेरीटाईम बोर्डाच्या सहकार्याने सध्या काम करत आहे. तसेच, मुंबईत व एमएमआर झोनमध्ये काही ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने आम्हाला वॉटर टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर आम्ही विचार करत आहोत. आमच्याकडे वॉटर टॅक्सी चालवण्यासाठी संसाधने आणि मनुष्यबळ आहे. आम्ही आमचा अहवाल लवकरच सरकारला सादर करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

घरातील वीज उपकरणे घराबाहेरून मोबाईलद्वारे बंद करणे शक्य

बेस्ट उपक्रम लवकरच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मिटर उपलब्ध करणार आहे. सध्या बेस्टचे शहर भागात १० लाख ८० हजार वीज ग्राहक आहेत. जर वीज ग्राहक घराच्या बाहेर जाताना पंखा एसी बंद करण्यास विसरला असेल तर स्मार्ट मीटर व डाऊन लोड केलेल्या मोबाईल मध्येअँपच्या माध्यमातून घरातील चालू पंखा, एसी व लाईट आदी वीज उपकरणे घराबाहेरूनच बंद करणे शक्य होणार आहे. तसेच, स्मार्ट मीटरच्या आधारे वीजग्राहकांना प्रत्येक युनीटचा खर्च आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर पाहता येईल. सप्टेंबर २०२३ मध्ये महिन्यापर्यत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण कऱण्यात येणार आहे.


गणेश नाईक यांना ‘या’ प्रकरणातून दिलासा? पुरावे सापडत नसल्याचा पोलिसांचा अहवाल