घर महाराष्ट्र नागपूर खबरदार! समृद्धी महामार्गावर रील्स बनवाल तर...

खबरदार! समृद्धी महामार्गावर रील्स बनवाल तर…

Subscribe

मुंबई : समृद्धी महामार्गाचे उद्धाटन झाल्यापासून अपघातांमुळे चर्चेत आहे. समृद्ध महामार्गावर आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या समृद्ध महामार्ग हा अपघातामुळे नाही. तर सोशल मीडियावरील इन्फ्लुअर्समुळे चर्चेत आला आहे. कारण इन्फ्लुअर्स हे समृद्ध महामार्गावर रिल्स बनवत असतात. यामुळे रील्स बनवणाऱ्याविरोधात सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्धाटन करण्यात आले. यानंतर समृद्धी महामार्गाचा पहिला आणि दुसरा टप्पा खुला करण्यात आला आहे. पहिला टप्पा नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलूपर्यंत आणि दुसरा टप्पा 81 किमीपर्यंत खुला करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. समृद्ध महामार्ग हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “खोके…खोके… ओरडणाऱ्यांकडे कंटेनर”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

रील्स बनवणाऱ्यांवर अशी होणार कारवाई

या महामार्गावर पर्यटनासाठी देखील लोक येतात. त्यावेळी पर्यटनस्थळी रिल्स बनवले जातात. या पार्श्वभूमीवर शासनाचे मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर रील्स काढणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या कारवासाची शिक्षा करण्यात आलेली आहे. महामार्गावर रील्स बनविताना किंवा कुठल्याही शूट करताना मोठा अपघात होण्याच शक्ता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. महामार्गावर व्हिडिओ शूट करणे किंवा रिल्स बनवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कलम 341 नुसार एक महिन्याचा कारवास किंवा 500 रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 283 या कलमांतर्गत सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा असुविधान निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात येईल. या अंतर्गत प्रवाशांवर 200 रुपयेसह करावासाची कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – खळ्ळखट्याक : राज ठाकरेंचा सकाळी आदेश; कार्यकर्त्यांनी दुपारी कंपनीचे ऑफिस फोडले

 फेन्सिंग नसल्यामुळे महामार्गावर अपघात – राज ठाकरे

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांमुळे चर्चेत राहिला आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूला कोठेही फेन्सिंगचे काम केले नाही. यामुळे महामार्गावर रस्त्यांमधून अनेक प्राणी जातात. त्यामुळे महामार्गावर प्राण्याचा देखील मृत्यू होतोय, असे ते पनवेल येथील निर्धार मेळाव्यात म्हणाले.

हेही वाचा – Buldhana Bus Accident : ‘या’ कारणांमुळे समृद्धी महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ?

महामार्गावर अपघातामुळे चर्चेत

महामार्ग खुला झाल्यापासून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला होता. यात 26 प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या महामार्गावर वाहनांचा वेगमर्यादा 120 किमी प्रतितास एवढी आहे.

- Advertisment -