घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावधान नाशिककर! पुण्यात सापडलेला 'झिका'चा रुग्ण मुळचा नाशिकचा रहिवासी

सावधान नाशिककर! पुण्यात सापडलेला ‘झिका’चा रुग्ण मुळचा नाशिकचा रहिवासी

Subscribe

सातपूर : पुण्यात झिका बाधित आढळून आलेला ६७ वर्षीय रुग्ण हा मूळचा नाशिकचा आहे. ते 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात आले होते. त्यापूर्वी ऑक्टोबर 22 ला ते सूरत येथे गेले होते. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, असे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांंगितले.

महापालिका अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रूग्ण 16 नोव्हेंबर 2022 ला 67 वर्षीय रुग्णाला पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ताप, खोकला, थकवा आणि सांधेदुखीचा त्रास होता. त्यामुळे या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी हा व्यक्ती आला होता. त्यानंतर या रुग्णाची तपासणी करण्यात आली. खासगी प्रयोगशाळेत रुग्ण 18 नोव्हेंबर 2022 झिकाबाधित असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2022 रोजी एनआयव्ही पुणे यांच्या तपासणीत रुग्ण झिकाबाधित असल्याचे निश्चित झाले. 22 नोव्हेंबरला पुणे महापालिकेच्या वतीने या भागात रोग नियंत्रण उपाययोजना करण्यात आली. तसेच, नाशिकमध्ये सातपूर कॉलनी पपया नर्सरी परिसरात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या आहे.

- Advertisement -
झिका व्हायरसची लक्षणे

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. त्वचेवर पुरळ, ताप तीव्र डोकेदुखी, सर्दी,घाम येणे, स्नायूमध्ये खूप वेदना, थकवा वाटणे, भूक कमी लागणे, खाज सुटणे, अशी लक्षणे आढळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -