घरट्रेंडिंग...तर वीज पुरवठा होईल खंडीत, असा मॅसेज तुम्हालाही आला असल्यास सावधान!

…तर वीज पुरवठा होईल खंडीत, असा मॅसेज तुम्हालाही आला असल्यास सावधान!

Subscribe

याप्रकरणी सायबर विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे अशा मॅसेजना बळी न पडण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

‘गेल्या महिन्याचं वीजबील (Light bill) भरलं नसल्याने रात्री साडेनऊ वाजता वीज पुरवठा खंडीत (Light Connection) होणार आहे. त्यामुळे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…’ असा मॅसेज जर तुम्हालाही तुमच्या मोबाईलवर आला असेल तर सावधान. कारण, सामान्य नागरिकांना गंडवण्याचे नवनवे प्रकार सध्या समोर येत आहेत. (Beware of fraud messages about your light connection)

हेही वाचा या मंत्री, आमदार, खासदारांनी थकवले लाखो रुपयांचे लाईट बील, या मंत्र्याकडे आहे सर्वाधिक थकबाकी 

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरटे नवनव्या युक्त्या शोधून सामान्य नागरिकांना फसवत असल्याचं समोर आलं आहे. आता वीजबील भरले नसल्याचा मॅसेज करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. याप्रकरणी सायबर विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे अशा मॅसेजना बळी न पडण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मॅसेजद्वारे दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास काय होईल?

मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. मोबाईल हॅक झाल्यास तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम लंपास केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बोगस मॅसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. तसेच, काही जण अॅनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करून तुमच्या संगणक प्रणालीचा अॅक्सेस मागू शकतात. अशावेळेस त्यांनी सांगितलेल्या कोणतेही अॅप्स डाऊनलोड करू नका. यामुळे तुमच्या संगणकातील सर्व माहिती त्या भामट्यांपर्यंत पोहोचू शकेल. या माहितीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -