घरमहाराष्ट्रराज्यापालांचं मराठी प्रेम; दीक्षांत समारोहाचं इंग्रजीतलं प्रस्ताविक थांबवत मराठीत कार्यक्रम करण्याच्या दिल्या...

राज्यापालांचं मराठी प्रेम; दीक्षांत समारोहाचं इंग्रजीतलं प्रस्ताविक थांबवत मराठीत कार्यक्रम करण्याच्या दिल्या सूचना

Subscribe

अहमदनगर येथील राहुरी कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मराठी प्रेम दिसून आलं. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजीमध्ये सुरू असताना राज्यपालांनी ते थांबवलं आणि पुढील कार्यक्रम मराठीमध्ये करण्याच्या सूचना दिल्या. तसंच, इंग्रजी शिका त्याला हरकत नाही, पण मराठी बोला, शिक्षण द्या, असं देखील राज्यपाल म्हणाले.

आपण आपल्या मातृभाषा, मातृभूमीसाठी काही केलं नाही तर काहीच उपयोग नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आपण मराठीतच बोललं पाहिजे. तसंच, कृषीचे विषय पुढील चार पाच वर्षात मराठीत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा, असं राज्यपाल म्हणाले. इंग्रजी शिका त्याला हरकत नाही, पण मराठी बोला, शिक्षण द्या, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. पुढे बोलताना त्यांनी उत्तराखंड मध्ये जाऊन शेतकऱ्यांना महाराष्ट्रामधून शेतीचे शिक्षण घेण्याच्या सूचना मी करत असतो, असंही सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात १०० टक्के कामकाज मराठीत करण्याचा आदेश काढावा अशी विनंती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपाल यांना केली.

शरद पवार, गडकरींना मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी प्रदान

दीक्षांत समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शरद पवार आणि नितीन गडकरींचं कौतुक केलं. शरद पवार आणि नितीन गडकरी यांचं कोणत्या शब्दात अभिनंदन करू कळत नाही. या दोन्ही नेत्यांचं राज्यातच नाही तर देशात मोलाचं कार्य आहे. दोघांचं कार्य अद्वितीय आहे, ताऱ्यासारखं त्यांचं कार्य आहे, असं राज्यपाल म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -