घरCORONA UPDATE'राष्ट्रपती राजवटीला घाबरले आणि लगेच बैठका घेतल्या', नारायण राणेंचा सरकारला टोला

‘राष्ट्रपती राजवटीला घाबरले आणि लगेच बैठका घेतल्या’, नारायण राणेंचा सरकारला टोला

Subscribe

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अपयशावर बोलावं

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी हे सरकार उपयशी ठरले आहे त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. मात्र आपण केलेली मागणी वैयक्तीक असून पक्षाची भूमिका नसल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी मुंबईतील राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधीक कोरोना रुग्ण वाढत असून सरकार ती नियंत्रणात आणण्यास अकार्यक्षम असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. यावरून राजकीय वातावरण तापले.

- Advertisement -

थोरांतानी राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मला वाटते. तसेच यावेळी बोलताना राणे यांनी एकत्र जाऊन राज्यातील हॉस्पिटलची पाहणी करूयात असे आव्हान थोरातांना दिले. त्याचप्रमाणे सुधीर मुनगुंटीवार यांना मी विचारत नाही. कोणी मला सांगावं असंही नाही. हे सरकार लोकांना वाचवण्यात अपयशी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वाचवा अशी मागणी मी केंद्र सरकार आणि राज्यपालांकडे केली आहे. मी भाजपाच्या नेत्यांना विचारायला गेलेलो नाही. ते वरिष्ठ असतील, पण मीदेखील माजी मुख्यमंत्री आहे. मी काय काल राजकारणात आलेलो नाही,” असं नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

बेताल संजय राऊत

संजय राऊत बेताल बोलत असतात, केंद्र सरकारने संजय राऊत यांना कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्यासाठी सल्लागार म्हणून ठेवलं आहे का?,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला. संजय राऊत यांना आत्मपरिक्षणाची गरज आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अपयशावर बोलावं. राष्ट्रपती राजवटीला इतके घाबरले की लगेच बैठका घेतल्या आणि सकाळी पत्रकार परिषद बोलावली असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

- Advertisement -

महाराष्ट्रात स्थिर सरकार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पण जमत नाही. सरकार स्थिर आहे का अस्थिर आहे. सरकार राहणार की जाणार हे लवकरच कळेल,” असं सूचक वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.


हे ही वाचा – गर्लफ्रेंडची हत्या लपवण्यासाठी त्याने केले आणखी ९ खून!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -