घरदेश-विदेशunion budget 2023 : कोरोनानंतरही देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती; अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांकडून मोदींचं कौतुक

union budget 2023 : कोरोनानंतरही देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती; अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांकडून मोदींचं कौतुक

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींना मोठ्या आशा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारत 10 व्या क्रमांकावर होता, पण आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, अशा शब्दात भागवत कराडांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. भागवत कराड आज सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. (Bhagwad Karads praised pm Modi before union budget 2023)

यावेळी बोलताना कराड म्हणाले की, कोरोनानंतर देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. आर्थिक सर्वेक्षण पाहिला तर देशाचा आर्थिक विकास होत असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारत 10 व्या क्रमांकावर होता, पण आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. गेल्या आठ वर्षात भारताने 10 क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अर्थसंकल्पाआधी हलवा समारंभ का केला जातो? वाचा

अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांनी केली देवाची पूजा

दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आज  सकाळी आपल्या घरी देवाची विधीवत पूजा केली, त्यानंतर ते घराबाहेर पडले. कराड यांनी केलेल्या पूजेचे फोटो सध्या सोशल मीडियावर येत आहेत.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2023 -24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. यासाठी त्या आता अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. तर मंत्री भागवत कराड देखील सकाळी अर्थमंत्रालयात पोहचले आहेत.  अर्थमंत्री सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील, त्यामुळे या भाषणाकडे सर्वांच लक्ष लागून आहे. दरम्यान मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये जीडीपी विकास दर 6.5 टक्के असेल.

हेही वाचा : union budget 2023 : जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यास भारत सज्ज – अमित शाह


union budget 2023 : आजच्या अर्थसंकल्पातून देशात आणखी मोठ्या आर्थिक सुधारणा होणार का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -