झिशान सिद्दीकीच्या हायकमांडला पत्राच्या वादावर भाई जगताप म्हणाले…. हा माझ्या घरातला

काँग्रेस पक्षाचा प्रश्न असून तो मी सोडवेन : भाई जगताप

काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हा माझ्या घरातला प्रश्न आहे. तो मी माझ्या घरात सोडवेन. तुम्हाला या गोष्टीचा एवढा कळवळा का? माझ्या घरातला प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचा प्रश्न असून तो मी सोडवेन. अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.

काय म्हणाले भाई जगताप ? 

हा माझ्या घरातला प्रश्न आहे. तो मी माझ्या घरात सोडवेन. तुम्हाला या गोष्टीचा एवढा कळवळा का? माझ्या घरातला प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचा प्रश्न असून तो मी सोडवेन. असं भाई जगताप म्हणाले. आम्ही एकत्र निवडणूक लढणार नाही आहोत. आम्ही वेगळे लढणार आहोत. हे तेव्हाही सांगितलं आहे. आजही आणि भविष्यातही सांगितलं आहे. यामध्ये काँग्रेसचा महापौर येईल किंवा काँग्रेसशिवाय महापौर निवडून येऊ शकणार नाही. हे सुद्धा मी अगोदर सांगितलं आहे आणि आताही सांगतोय. अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.

आमच्याकडे काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. आपल्याला आपली बाजू ,विचार आणि अडचणी पूर्ण मांडण्याची मूभा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आहे. पूर्वी सुद्धा अशी काही पत्रे दिलेत. हे काही नवीन नाहीये. त्यामुळे हा माझ्या घरचा प्रश्न आहे. ते मी बघून घेऊन, असे वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय.

२०१२-१३ पासून हिंदी साहित्य भवन तयार झालेलं आहे. तसेच त्याचं भूमीपूजन सुद्धा झालेलं आहे. कोणत्या प्रकारची मानसिकता आहे. भाषणं करताना खूप मोठ्या वार्ता करतात. आम्ही निर्णय घेतलाय त्याचं स्वागत करा. गुजरात साहित्य अकादमीने ३५ लाखांमध्ये काम होत नव्हतं. त्यामुळे १ कोटीची मागणी केली होती. या कारणामुळे आम्ही निर्णय घेतला होता.

उत्तर भारतीयांच्या लोकांबाबत भाजप पक्षाकडून टीका?

मी २०१३ ची गोष्ट करत आहे. भवनला भरपूर पैसे लागणार आहेत. कोणतेही सरकारी काम पूर्ण करण्यासाठी पैसे एकदम येत नाहीत. पुढे जाऊन जे काही पैसे लागणार आहेत. त्यासाठी अमित देशमुख केव्हाही तयार आहेत. भाजपाचे लोक हिंदी भाषकांच्या लोकांबाबत बऱ्याच गोष्टी करतात. उत्तर भारतीयांच्या लोकांबाबत सुद्धा बोलतात. अजून पर्यंत उत्तर भारतीयचा अध्यक्ष मुंबईत झालेला नाहीये. परंतु काँग्रेसने तीन दिले आहेत. ही गोष्ट साहित्यिकाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने घेतलेला मोठा निर्णय तो योग्य होता. यावर भाजपाने अडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु महाविकास आघाडी सरकार अजूनपर्यंत मजबूत आहे.

त्रिपूरातील दंगलीबाबत भाई जगताप यांची प्रतिक्रिया…

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दंगली घडत तसेच प्लॅन करून ज्या गोष्टी घडवण्यात येत आहेत. त्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला हे अजिबात पटलेलं नाहीये. याचा जेवढा निषेध करता येईल. तेवढा निषेध करावा. असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आक्रोश मोर्चादरम्यान धक्काबुक्का केली. असा प्रकारचा आरोप झिशान सिद्धिकी यांनी भाई जगताप यांच्यावर केला होता. त्यावर भाई जगताप यांनी आज प्रतिक्रिया दिली असून हा घरातील प्रश्न हा तो आम्ही मिटवू.असं भाई जगताप म्हणाले आहेत.


हेही वाचा: मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर, मुंबई यूथ काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्धिकी यांचे सोनिया गांधींना पत्र