घरमहाराष्ट्रजलसमाधीमुळे प्रशासन धस्तावले

जलसमाधीमुळे प्रशासन धस्तावले

Subscribe

तूर्तास या योजनेचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याने आपल्या मागण्यांसाठी धरणात जलसमाधी घेतल्याने, धस्तावलेल्या जिल्हा प्रशासनाकडून धरणाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तसेच पालिकेने पाणीपुरवठा योजनेसाठी पोलिसांकडे मागितलेला बंदोबस्त गणेशोत्सवामुळे उपलब्ध करून देता येणार नसल्याचे पोलिसांकडून महापालिकेस कळविण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास या योजनेचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर होत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -