घरक्राइमभंडाऱ्यातील पीडितेवरील अत्याचाराला पोलिसांची बेफिकीरीही कारणीभूत? वैद्यकीय चाचणीतून आले सत्य समोर

भंडाऱ्यातील पीडितेवरील अत्याचाराला पोलिसांची बेफिकीरीही कारणीभूत? वैद्यकीय चाचणीतून आले सत्य समोर

Subscribe

भंडाऱ्यातील सामुहित बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या बेफिकीरीमुळे पीडितेवर दुसऱ्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. बहिणीसोबत झालेल्या या पीडित महिलेवर एक दोन नाही तर वारंवार बलात्कार झाला. पीडितेवर पहिल्यांदा गोरेगाव जंगलात बलात्कार झाला. दुसऱ्या दिवशी ही मुरमाळी गावाजवळ फिरत होती तेव्हा तिथल्या पोलीस पाटील महिलेने तिची विचारपूस केली, या पोलीस पाटील महिलेने तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवले. याठिकाणी पीडितेला वैद्यकीय मदत देण्याऐवजी तिची चौकशी झाली, यानंतर पीडित महिला लगेचच पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली, याठिकाणी पुन्हा पीडितेवर दोन नराधमांनी बलात्कार केला.

बहिणीसोबत झालेल्या शुल्लक वादातून 35 वर्षीय पीडित घटस्फोटीत महिला रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. यावेळी तीन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. एकदा नाही तर सातत्याने मदत देण्याच्या बहण्याने तिच्यावर बलात्कार होत राहिला. भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हाळमोह गावात 2 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे महिलेवर वारंवार बलात्कार झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. तसेच पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले, याशिवाय ही पीडिता जर पोलीस ठाण्यात आली होती तर तिच्यावर पळून जाण्याची वेळ का आली असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

- Advertisement -

नेमकं घडलं काय?

पीडित महिला पतीपासून विभक्त आपल्या बहिणीकडे गोंदियामध्ये राहत होती, 30 जुलैला तिचे बहिणीसोबत भांडण झाल्याने ती रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडली. यावेळी गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जात होती. यावेळी रस्त्यावरील एका अज्ञाताने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले आणि गोंदियातील मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर नराधमाने दुसऱ्या दिवशीही 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले, यानंतर पीडितेला तिथेच सोडून पळून गेला.

यानंतर पीडिता कशीबशी जंगलातून बाहेर निघत भंडारा तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. यावेळी दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या आरोपीने एका मित्राच्या मदतीने 1 ऑगस्ट रोजी पीडितेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन अत्याचार केले. यावेळी आरोपी पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून पळाला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.

- Advertisement -

यावेळी गावकऱ्यांनी पीडितेला विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असल्याचे पाहिले. पीडितेसोबत काहीतरी गैर झाल्याचे लक्षात आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी पीडितेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीस आले.

पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीला गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्याचा तपास आता गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडून सुरु आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गोरेगावातील मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. नागपूरचे प्रभारी आयजी संदीप पाटील यांनी देखील लाखनी पोलीस ठाण्यात घटनेची चौकशी केली.

दरम्यान लाखनी पोलिसांना या हलगर्जीपणा संदर्भात भंडाऱ्याचे पोलीस अधिक्षक लोहित मसानी यांना विचारले असता ते म्हणाले की, पीडिता पोलीस ठाण्यात आली तेव्हा तिच्या अंगावरील कपडे व्यवस्थित होते. तिला यावेळी विचारपूस केली मात्र तिने काहीच सांगितले नाही, त्यामुळे तिला पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षा कक्षात महिला पोलीस शिपायांसोबत बसवून ठेवले. मात्र पहाटेच्या सुमारास महिला पोलीस ठाण्यातून पळून गेली अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.


पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -