घरमहाराष्ट्रअंधेरीत कॉंग्रेसचा रेल रोकोचा प्रयत्न

अंधेरीत कॉंग्रेसचा रेल रोकोचा प्रयत्न

Subscribe

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने अंधेरी स्थानकामध्ये रेल रोकोचा प्रयत्न करत आपला राग व्यक्त केला.

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ची हाक देत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने अंधेरी येथे संतप्त होत रेले रोकोचा प्रयत्न केला. अंधेरी स्थानकात लोकल थांबवण्याचा प्रयत्न करत आपला राग व्यक्त केला आहे. अंधेरीत कॉंग्रेसच्या कार्यरकर्त्यांने रेल रोको करण्याकरता रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केले. रेल रोको करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात पोलिसांना यश आले आहे. या बंदला इतरही विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून आज सकाळपासूनच देशभरात या बंदचे पडसाद उमटू लागले असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -