Homeमहाराष्ट्रRaigad Guardian Ministership : भरत गोगावलेंनी दिलेली मुदत संपली, अद्यापही पालकमंत्रिपदाचा निर्णय...

Raigad Guardian Ministership : भरत गोगावलेंनी दिलेली मुदत संपली, अद्यापही पालकमंत्रिपदाचा निर्णय नाही

Subscribe

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य केले होते. मात्र भरत गोगावलेंनी दिलेली 2 दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा झाली होती. पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू केले. या पार्श्वभूमीवर परदेशातून रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती. यानंतर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदाबाबत दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य केले होते. मात्र भरत गोगावलेंनी दिलेली 2 दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Bharat Gogawale deadline for the guardian ministership of Raigad has expired but there is still no decision)

राज्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपाचा गिरीश महाजन यांना संधी देण्यात आली होती. मात्र रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यामुळे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. तर गोगावले समर्थकांनी जोरदार विरोध केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. अशातच भरत गोगावले यांनी चार दिवसांपूर्वी म्हणजेच 29 जानेवारी रोजी मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे नेतेही उपस्थित होते. मात्र भेटीच्या ऐनवेळी अजित पवार जेवायला गेले होते. मात्र यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले होते.

हेही वाचा – Chandrahar Patil : “शिवराजने पंचाला लाथ मारणे चुकीचे होते, त्याने खरेतर…”, चंद्रहार पाटील संतापले

अजित पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही आदिती तटकरेंना पालकमंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न करत आहात का? त्यामुळेच तुम्ही सुनील तटकरेंवर टीका करत आहात? या प्रश्नांवर भरत गोगावले म्हणाले होते की, जे झाले, ते झाले, पण आता जे काही होईल, ते चांगले होईल. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होईल. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याचपार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले होते की, रायगडला सहपालमंत्रिपद भेटले तर तुम्ही त्या निर्णयाला सहमत असाल का? यावर भरत गोगावले म्हणाले होते की, “आता तुम्हाला काही सांगत नाही. दोन दिवसांत पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेते दोन दिवसांत निर्णय घेतील. सध्यातरी पालमंत्रिपदाचा वाद थांबला आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे विचारण्यात आले की, तुम्ही पालकमंत्री झाला, असे समाजायचे का? या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले होते की, “असे उलटे काही विचारू नका. जरा थांबा, घाई कशाला करता, सकारात्मक बातमी मिळेल, असे वाटत असल्याचे भरत गोगावले म्हणाले होते.

पालकमंत्रीपदाचा तिढा अधिकच क्लिष्ट होतोय का?

भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय दोन दिवसात होईल, अशी सांगितेली मुदत आता संपली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली विधानसभेत प्रचार करून पुन्हा राज्यात परतले आहेत. मात्र अद्यापही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक झालेली नाही. त्यामुळे, महायुतीतील रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा अधिकच क्लिष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पालकमंत्रिपदाबाबत कधी निर्णय होतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींवर दाखल होऊ लागले गुन्हे, महिलांमध्ये धास्ती वाढली