घरमहाराष्ट्रपृथ्वीराज चव्हाण सांगतात 'भारत जोडो यात्रा' काँग्रेसची नाही तर....

पृथ्वीराज चव्हाण सांगतात ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेसची नाही तर….

Subscribe

काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील व्यक्ती नको अशी ठाम भूमिका जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतले जाते. अशात पृथ्वीराज चव्हाण आता राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो यात्रेसाठी जय्यत तयारी करत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची तयारी आणि व्यवस्थेची माहिती दिली. (bharat jodo yatra in not of congress but if like minded parties prithviraj chavan)

काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची रॅली नसून एका तिरंग्याखाली काढण्यात आलेली समविचारी पक्षाची आणि समविचारी नागरिकांची रॅली आहे. या रॅलीला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही यात्रा संपूर्ण देशाला जोडणारी आहे, असे मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले.

- Advertisement -

चव्हाण म्हणाले की, भारत जोडो यात्रेची राज्यातील सुरुवात ही नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे होणार आहे. काँग्रेसमध्ये 60 संघटनात्मक जिल्हे राज्यात आहे. प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी यात्रेत समाविष्ट व्हायचे आहे ते सांगण्यात आले आहे. पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बुलढाणामधील गावात पाठविण्यात येणार आहे. देशातील हा सर्वात मोठा कार्यक्रम असून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

चव्हाण पुढे म्हणाले की, पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातील यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. अनेक सहयोगी राजकीय पक्षाच्या नेत्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आली असून राज्यात केवळ पाच ते सहा जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात नेमके कोणत्या दिवशी ही यात्रा येणार आहे किंवा जाणार आहे, त्यानुसार, पार्किंग, राहणे, भोजन, सुरक्षा अशी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान यात्रेसाठी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहरसाठी बुलढाणा जिल्हा मिळाला असून एकूण 1150 लोक नोंदणी झाली आहे. यात 3 नोव्हेंबर रोजी पुण्यात कोथरूड ते आगाखान प्लॅस दरम्यान हजार गाड्यांची रॅली काढण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण ऐतिहासिक ठिकाणची माती आणि नद्यांचे पाणी गोळा करून त्याचे यात्रा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात 3 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. 250 हजार लोकांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे, असे देखील चव्हाण म्हणाले.


बच्चू कडू-रवी राणांमध्ये ‘वर्षा’वर अडीच तास बैठक; तोडगा निघाला का?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -